कुडाळ ता.8 – जावली तालुक्यात प्रथमच आज 8 फेब्रुवारी रोजी कुडाळ येथील स्वामी मंगल कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता व उद्या 9 फेब्रुवारी रोजी आनेवाडी येथे अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या ऊस कार्यक्षेत्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच उत्तर व मध्य भारत नेटाफिम इरिगेशनचे कृषी तज्ञ श्री अरुणजी देशमुख यांचे दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस खोडवा व्यवस्थापन आणि लागणीतून एकरी 100 टन उत्पन्नाचे उदिष्ठ याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे.
अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या वतीने जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखाना सूरू करण्यात आला असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे, कारखान्याचा मुख्य घटक असलेल्या उसाचे क्षेत्र वाढावे, तसेच शेतकऱ्यांनाचेही उस पिकातून आर्थिक जीवनमान उंचावे या उद्देशाने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचनेने आणि प्रतापगडे चेअरमन सौरभ (बाबा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तसेच उत्तर व मध्य भारत नेटाफिम इरिगेशनचे कृषी तज्ञ श्री अरुणजी देशमुख यांचे दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस खोडवा व्यवस्थापन आणि लागण याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, डिजिटल प्रोजेक्टर सहित, आणि आपला शेती क्षेत्रातील 28 वर्षाचा अनुभवाचा फायदा जावली तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी या माहितीपूर्ण कार्यक्रमातून मिळणार आहे, यासाठी जावली तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून याचा फायदा आपल्या विक्रमी ऊस उत्पादनासाठी मिळवावा असे आवाहन आयेजकांकडून करण्यात आले आहे.