कुडाळ ता.26 – :जावळी तालुक्यात 75 वा प्रजासत्ताक दिन आज ता.26 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकिय कार्यालये, बँका, पतसंस्था तसेच ग्रामपंचायत, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयात उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा या ठिकाणी तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख,पदाधिकारी,शाळेचे शिक्षक व विद्यार्थी आणि पत्रकार यांची उपस्थिती होती. पंचायत समिती, कोर्ट,पोलीसस्टेशन,प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक, माध्यमिक शाळा सर्वच सरकारी निमसरकारी कार्यालयआदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
“मेरा भारत महान” या संकल्पनेतून चंद्रयान 3 व अयोध्या धाम या विषयावर नृत्य सादर करण्यात आले यावेळी प्रभू श्री राम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, पहा खालिल व्हीडीआो…
कुडाळ येथे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सुरेखा कुंभार यांनी केले. प्राथमिक केंद्र शाळा, महाराजा शिवाजी हायस्कूल, कृषी उत्पऩन बाजार समिती, विविध सहकारी पतसंस्था, सोसायटी, बँका, आदी ठिकाणी मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले, यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली देशभक्मतीपर मनोगते व्यक्त केली. दोन्ही शाळांकडून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यावेळी “मेरा भारत महान” या संकल्पनेतून चंद्रयान 3 व अयोध्या धाम या विषयावर नृत्य सादर करण्यात आले यावेळी प्रभू श्री राम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले,
यावेळी महाराजा शिवाजी हायस्कूल माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड संचालन सादरीकरण केले. भारत माता की जय च्या घोषणांणी परीसर दणाणून गेला, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा यावेळी गैारव करण्यात आला, विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. अनेक ठिकाणी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. प्रत्येक गावागावात मोठ्या आनंदाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.