कुडाळ दिनांक 3 – कुडाळ ता. जावळी येथील संत सावतामाळी समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण कुडाळ गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली, यावेळी शेकडो महिला,युवती व लहान लहान मुली या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या, त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची महती या मिरवणुकीद्वारे दाखवून दीली.
कार्यक्रमाच्या सूरूवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समाजबांधव व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले. तसेच समाजातील ज्येष्ठ मंडळीं तसेच महिलांनी व्याख्यानांद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सावतामाळी मंदिरापासून मिरवणुकीस सरूवात करण्यात आली, यावेळी पारंपारिक वेशभुषेत भव्य रँली काढत विद्याथीनीं, मुली व युवतींनी सावित्रीच्या लेकी बनून शिक्षणाचा वारसा जोपासण्याची शपथही घेतली. यावेळ ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा….मुलगी शिकली प्रगती झाली अशा घोषणा महिला व मुलींनी दिल्या.
मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत असताना गावातील ग्रामपंचायत व विविध संस्थाच्या वतीने ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून प्रतिमेला अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आले व उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. तसेच अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाराजा शिवाजी हायस्कूल या ज्ञानमंदिरातही मुलींची जनजागृतीपर व्याख्याने, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन सोहळा, वक्तृत्व स्पर्धा, असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
३ जानेवारी म्हणजे देशाची पहिली महिला शिक्षक, महिला विद्यार्थीनी, महिला समाजसेविका असे विविध पातळीवर योगदान दिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षका किंवा पहिल्या महिला शाळेच्या पहिल्या मुख्यध्यापिका आणि संस्थापिका देखील होत्या. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव नामक छोट्या गावी झाला होता. अवघ्या ९ वर्षांच्या सावित्रीबाईंचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतीराव फुलेंशी लावून देण्यात आला. वयाच्या ९ व्या वर्षा पर्यत सावित्रीबाईंनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यांचे तेरा वर्षांचे पती मात्र ३ वर्गात शिकत होते आणि आपल्या नवऱ्याला शिकताना बघूनचं सावित्रींबाईंच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. अखेर शिक्षण घेण्याचा संकल्प करत सावित्रींबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लोकांची टिका टिपण्णी ऐकत सावित्रींबाईंनी स्वत शिक्षण घेतल. एवढचं नाही तर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी देशातील पहिली महिला शाळा उघडून मुलींना शिक्षण देण्यास सुरवात केली. आज त्याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती होती.