जावळीजिह्वासामाजिक

शासनाने ढोंगे आणि सोंगे बंद करावी- विलासबाबा जवळ : ३१ डिसेंबरला दारूची दुकाने रात्रभर चालू या निर्णयाचा जाहीर निषेध

कुडाळ – शासनाला नेमक हवं आहे काय? हे एकदा जाहीर करावे. एका बाजुला दारूबंदी व व्यसनमुक्तीचे धोरण तयार करायचे आणि दुसर्‍या बाजुला २४,२५ व ३१ डिसेंबरला रात्रभर दारूची दुकाने सुरू ठेवायचा निर्णय जाहीर करायचा हे दुर्देवी असून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाव घेवून राज्य करणार्‍या सरकारची हिच का शिवनीती आहे असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्र सरकारने ही सोंगे आणि ढोंगे बंद करावी अशी भूमिका व्यसनमुक्त युवक संघाचे राज्यप्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.


महाराष्ट्र शासन नेहमीच महसुलाच्या हव्यासापोटी दारूची उपलब्धता कमी करण्या ऐवजी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम करीत आले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते गाव खेड्यांमध्ये समृध्दता आणायची असेल तर नशाबंदी करणे गरजेची आहे.स्वातंत्र्य उत्तर काळात सरकार आणि लोकप्रतिनीधी यांनी गांधीजींच्या विचाराला मुठमाती देत आपल्या बगल बच्चांना दारूदुकानांच्या परवान्यांची खैरात करीत गावागावात मंदिरे कमी व मद्यालयांची संख्या अधिक अशी अवस्था करून युवापिढीला नशेच्या खायीत लोटण्याचे पाप केले आहे.माता-भगिनींचे संसार उध्वस्थ करण्याचा अधिकार या सकारलाआहे का?२४,२५ व ३१ डिसेंबर नेमका कोणता सण शासनाने जाहीर केला आहे हे तरी जनतेला सांंगावे.भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी अंमली पदार्थांविरोधी प्रचार करायला सांगतात.त्यांच्याच विचाराने छत्रपती श्री शिवाजी महाराज,प्रभू श्री राम यांचे हे राज्य आहे म्हणणारे महाराष्ट्र सरकार त्यांच्या विचारांना तिलांजली देत हॅप्पी न्यु एअर साजरा करण्यासाठी जनतेने रात्रभर दारूच्या नशेत रहाण्यासाठी दुकाने पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेणारे मंत्री आपल्या मुला-नातवांना याच रात्री दारू पाजतील का?


या रात्री दारूच्या नशेत होणारे खुन,मारामार्‍या, अपघात,विनयभंग,बलात्कार या घटनांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? दारूच्या दुकानांना रात्रभर परवानगी देताना पोलिस बांधवांना मात्र रात्रभर बंदोबस्ताला लावून दारू पिवून वाहन चालविणार्‍या चालकांवर दंडात्मक कारवाई करायला लावायची ही दुट्टपी भूमिका नाही का?
व्यसनमुक्त युवक संघ व अनेक समविचारी संघटना गेली अनेक वर्षे ३१ डिसेंबरला दारू नको, दुध प्या असे उपक्रम राबवित व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.१ जानेवारी या नववर्षदिन व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करीत असून शाळा,महाविलयांमधून विद्यार्थ्यांना संकल्प शपथ दिल्या जात आहेत.अशा उपक्रमांना सहकार्य करण्या ऐवजी सरकार रात्रभर दारू प्या असा संदेश देवून काय साद्य करणार आहे याचा विचार राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button