कुडाळ ता. 19 – ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी व आरक्षण टिकवण्यासाठी ते कायम राहावे यासह विविध मागण्यांसह वाई येथील एल्गार मेळाव्याच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कुडाळ गावांतील ओबीसी बांधवांनी कुडाळ गावातून दुचाकी रॅली काढली यावेळी ओबीसी आरक्षण संदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदारापासून रँलीला सुरूवात झाली त्यानंतर कुडाळ बाजारपेठेतून महाराजा शिवाजी हायस्कूल या मार्गाने रँली वाई कडे मार्गस्थ झाली, यावेळी कुडाळ गावातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने रँलीत सहभागी झाले होते, पुढे या रँलीचे रूपांतर वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये झाले.
यावेळी मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देवू नये अशी मागणी करून सध्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांचेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका झाली हा प्रकार थांबला पाहिजे, ओबीसी नेत्यांवरील सातत्याने होणारे आरोप यापूढे सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.यावेळी ओबीसी आरक्षणासाठी एल्गार करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येत ओबीसी बांधव सहभागी झाले होते. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली.