कुडाळ ता. 24 – सातासमुद्रापार राहूनही आपले सण आणि परंपरा जपणारे आपले भारतीय नागरिक यांचा सर्वाना अभिमान वाटतो. सर्वत्र पाश्चात्य संस्कृती चे वारे वाहत असताना आपले लोक जगभरात आपले भारतीयत्व जपताना दिसत आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे न्यू जर्सी- (अमेरिका) इथे तीस लहान मुलांनी मिळून ‘सणांची गोष्ट ’ हे नाटक उत्तमरीत्या सादर केले. आपल्या सर्व सणांची माहिती या नाटकातून त्यांना मिळाली.
नाटकाचे लेखन सचिन पिसाळ व स्मिता पिसाळ यांनी केले त्यात त्यांना त्यांचे मित्र व पालक यांचे खूप सहकार्य मिळाले. ओझर्डे ता. वाई योथील या जोडप्याने सातासमुद्रापार आपली संस्कृती जतन करण्याचा प्रत्यन केला आहे. यावेळी सारा पिसाळ व साइषा पिसाळ या त्यांच्या मुलींनीही उत्तम अभिनय केला. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्व समजणे हे आपले काम आहे. सर्वांनी आपले सण आणि भाषा यांचे जतन करावे ही आपली जबाबदारी आहे.
स्मिता व सचिन पिसाळ हे अमेरिकेत वास्तव्यास असून ते सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत. सचिन पिसाळ मुळचे आोझर्डे येथील असून सैा. स्मिता ह्या कुडाळ ता.जावळी येथील आहेत ,३५ वर्षांपूर्वी आंबेकर दांपत्याने रेडाँल्फ येथे सुरू केलेली मराठी शाळा ही सर्वात जुनी मराठी शाळा असून त्यातून खूप मुले मराठी शिकली आहेत.