कुडाळ त. 18- आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या मराठा क्रांतीसूर्य मनोज जरांगे – पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जावली तालुक्याच्या राजधानीत मेढा येथे आज शनिवारी दुपारी होणाऱ्या ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव मेढा नगरीत दाखल झाले असून मेढ्यातील मुख्य रस्तायवर अवघे भगवे वादळ तयार झालेले पहावयास मिळत आहे, काही वेळातच प्रय्तक्ष सभेला सुरूवात हेणार असून अवघा मराठा समाज त्यांचे धगधगते विचार ऐकण्यासाठी आतुर झाला आहे. सभेला पन्नास हजार लोक उपस्थित राहतील अशी आशा मराठा समन्वयकांनी व्यक्त केली आहे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली होती त्याच पध्दतीने मराठ्यांच्या आरक्षणासाठी जावलीकरांच्यावतीने जरांगेपाटील यांना तळपती तलवार भेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या भव्य सभेच्या तयारीबाबत मराठा समन्वयकांनी माहिती दिली आहे.
सभेसाठी तालुक्यात एक्कावन्न मराठा समन्वयकांची नेमणूक करण्यात आली असून गेल्या आठ दिवासंपासून गावोगाव बैठकांचे सत्र सुरू होते. तसेच सभेसाठी पाचशे स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जरांगे- पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी जागोजाग स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच येणाऱ्या वाहनांचे पार्किंग ज्या त्या दिशेला करण्यात आले आहे. तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून पाण्याची सोय करण्यात आली आहे. इमर्जन्सी उदभवल्यास रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहेत. ऊन असल्यामुळे मराठा समाजाने येताना डोक्यावर टावेल खाण्यासाठी थोडीशी दोरी आणावी असे आवाहन समन्वयकांनी केले आहे. संपूर्ण सभा लाईव्ह दाखवली जाणार आहे. सभे अगोदर वातावरण निर्मितीसाठी कोल्हापूर येथील शाहीर रंगराव पाटील यांचा शाहिरीबाज सादर करण्यात आला आहे.तालुक्यातील प्रत्येक गावापासून सभे ठिकाणी मराठा समाजाची ने-आण करण्यासाठी मोफत सेवा ठेवण्यात आली आहे. तसेच प्रतापगड कारखाना व मानकुमरे पाँईट याठिकाणी सभेला येणाऱ्या बांधवांसाठी चहा नाष्ठा्याची सोय करण्यात आली आहे. सभेला मराठा समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी करावी, असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे.