महेश बारटक्के -प्रतिनिधी
कुडाळ ता. 27 – गेल्या आठ दिवसांपासून गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि आरास पाहण्यासाठी बाहेर पडत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यावेळी घरगुती गणपतीही लक्षवेधक ठरत आहेत. गणपती बाप्पांच्या उत्सवासाठी घरातील बच्चे कंपनी आणि तरुणांचा उत्सह वेगळाच असतो.सजावटीसाठी त्यांचा पुढाकार असतो. वेगवेगळ्या कल्पना वापरुन आपला देखावा अधिकाधिक चांगला करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जातो. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील प्रविण रामचंद्र मुळे यांनी घरच्या गणपती समोर वर्ल्ड कप 2023 क्रिकेट स्पर्धेचा देखावा बनवला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी प्रविण व त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या महिन्यांपासून तयारी केली होती. त्यांनी वर्ल्ड कप 2023 क्रिकेट स्पर्धेचा देखावा साकारण्यासाठी प्रत्यक्षात क्रिकेटचेस्टेडीयम, ग्राउंड, स्टेडीयम वरील हँलोजन लाईटस, वर्ल्ड कपची सोनेरी ट्राँफी, उंदरांच्या रूपात खेळाडू असे वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकृती साकारली आहे.
यंदा भारतात 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 टीम खेळणार आहेत. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे.येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचेच आौचित्य साधून प्रविण व त्यांच्या कुटुंबियांनी वर्ल्ड कप 2023 क्रिकेट स्पर्धेचा देखावा सादर केला आहे. या देखाव्याची क्रकेट प्रेमींना भुरळ पडली आहे.
वर्ल्ड कप 2023 क्रिकेट स्पर्धेचा देखावा पाहण्यासाठी खालील व्हिडीआो पहा…….
प्रविण यांनी तयार केलेला देखावा पाहण्यासाठी कोरेगाव येथीलच नाही तर परिसरातील नागरिक भेट देत आहे. प्रविण यांनी तयार केलेल्या देखाव्याचे कौतूक अनेक जण करत आहेत. आता दहा दिवस गणेशोत्सव असला तरी या माध्यमातून क्रकेटचा फिवर यातून दिसून येऊ लागला आहे, यानिमित्ताने गणेशोत्सवात पारंपारिकता आणि आधुनिकतेचा संगम झालेला दिसत आहे. गणपतीसाठीची सजावट आणि देखाव्यावर देखील आधुनिकतेचा प्रभाव जाणवत आहे. या गणेशाची सजावट त्यामुळे चर्चेचा विषय झाली असून त्यास पहायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. प्रविण मुळे हे दरवर्षी चालू घडामोडींवरील विषय गणपतीच्या सजावटीसाठी निवडत असतात. येथील सजावट अशी तयार केली आहे की आपल्याला आपण एखाद्या क्रकेटच्या स्टेडीयमवरच आलो आहोत याचा प्रत्यय येतो.