कलाजावळीजिह्वासामाजिक

महिलांच्या कार्याचा ठसा उमटवणारा देखावा “बाईपण भारी देवा”- बामणोलीच्या तरडे कुटुंबियांनी साकारली विघ्नहरत्याची आगळी वेगळी “आरास”

महेश बारटक्के – (प्रतिनिधी)
कुडाळ ता. 23 – देखावे हे गणोशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. विविध सामाजिक, प्रबोधनात्मक तसेच ऐतिहासीक विषयांवरील देखावे गणेशोत्सवात सादर केले जातात. दरवर्षी चालु घडामोंडींवर आधारित विषयांवर देखावे सादर केले जातात. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणपती, गैारी सजावटीमध्येही अशा आगळ्या वेगळ्या देखाव्यांचे सादरीकरण केले जाते, जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथे अशाच एका ताज्या विषयावर अनुसरून देखावा सादर करण्यात आला आहे, बामणोली तर्फ कुडाळ येथील सैा.स्वप्ना श्रीकांत तरडे, सुदर्शना चंद्रकांत तरडे इनामदार, रूपाली सुनिल सुर्यवंशी, प्राजक्ता दिलिप सुर्यवंशी, स्नेहल अमित निरमल आदींनी मिळून त्यांच्या घरगुती गणपती गैारी सजावटीमध्ये विघ्नहरत्याची आरास “बाईपण भारी देवा” या विषयावर केली आहे, या देखाव्याची संपुर्ण जावली तालुक्यात चर्चा असून बामणोली येथे जाऊन प्रत्यक्ष या देखाव्याची पाहणी करण्यासाठी गर्दी होत आहे.


यावेळी देखाव्याबाबत माहीती देताना सैा.स्वप्ना तरडे म्हणाल्या, आम्ही दरवर्षी ताज्या घडामोंडीवर आधारित व सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करत असतो, यंदाच्या विषयाची पार्श्वभूमी अशी की आम्ही तरडे कुटंबिय सहकुटुंब मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा” पहायला गेले होते, आणि चित्रपट पाहता पाहता लक्ष्यात आले की घर, संसार सांभाळत आपले बाईपण जपत महिलांनी सर्वच क्षेत्रात अविश्वसनीय कार्य केले आहे, अनेक असाधारण कार्य करणाऱ्या स्त्रिया या घडल्या आहेत,म्हणून हा विषय मांडून आपल्या मुलांना स्त्री चा सन्मान करणे,मुले मुली एक समान याबद्दल ज्ञात करण्याचा हा सरळ सोप्पा उपाय आम्हाला उमगला, मग काय आमच एकमतानी ठरलं हाच विषय मांडून त्या सर्व महिलांच्या कार्याला आमच्या तरडे कुटुंबीयांकडून त्यांच्या कार्याला सलाम.

सदरची आरास विविध 5 ते 6 भागात दाखवली आहे. १) पहिल्या भागात ग्रामीण भागातील महिला आपला संसार, रोजची दैनंदिन कामे करताना दाखवण्यात आले आहे, 2)भारतीय महिला सर्व क्षेत्रात निपुण असून, अख्या जगात कीर्ती गाजवत आहे याची प्रतिकृती दाखवली आहे. तू “आदिशक्ती” तूच “महाशक्ती” तुझ्या कृपेने सजला संसार जगाचा.3)तिसऱ्या भागात महिला सशक्तीकरणात,महिलांच्या शिक्षणात अमूल्य कामगिरी बजावनाऱ्या, महिलांची प्रथम शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य थोडक्यात मांडले आहे. मुली मुळेच जगाची उत्पत्ती, नवीन पिढ्या निर्माण होतात या विषयाला साजेसा असे एक कल्पक प्रतिकृती बनवली आहे. सर्वच भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचे थोडक्यात कार्य, वर्णन करणारे देखावा यानिमित्ताने मांडला आहे, सर्व महिलांचे कीर्ती, योगदान आणि प्रचंड इच्छाशक्ती पाहता आपसूकच आपल्या तोंडी येते तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. “बाईपण भारीच देवा”……आमच्या बाप्पाचा देखावा हा पूर्णपणे पर्यावरण पोषक वस्तू पासून तयार केला आहे, बाप्पाची मूर्ती शाडू मातीची आहे. एकुणच या सुंदर देखाव्याची संपुर्ण तालुक्यात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button