कुडाळ ता. 21 – जावली तालुक्यातील राजकारण, समाजकारण, उद्योग आणि सांप्रदायिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व व खर्शी बारामुरे गावचे सुपुत्र बापुराव कोंडिबा पार्टे (जाधव) उर्फ आप्पा यांचे सोमवार ता. 21 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी वृध्दपकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्यावर सातारा येथील संगम माहुली या ठिकाणी उद्या मंगळवार ता. 22 आँगस्ट रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पाश्चात दोन विवाहीत मुले व तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती हणमंतराव दादा पार्टे (जाधव) व उद्योजक दिलिप पार्टे (जाधव) यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच करहर विभागासह तालुक्यावर शोककळा पसरली. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला व सातारा येथील शारदानंद या त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेत आदरांजली वाहीली.
खर्शी बारामुरे ता. जावळी गावचे सुपुत्र असलेले बापुराव पार्टे (जाधव) हे आप्पा नावाने सुपरिचित होते, ग्रामिण भागात राहूनही अतंत्य प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी जावळी तालुक्यासह जिल्हयातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने स्वताचा वेगळा ठसा उमटवला होता, खर्शी बारामुरे गावचे माजी सरपंच, जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सातारा बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष असा विविध उच्चपदावर त्यांनी राजकीय प्रवास यशस्वीपणे पुर्ण केला होता, सातारा सारख्या जिल्हयाच्या ठिकाणी प्लँनेट उदयोग समुह, अलिशान फर्निचर, व जयभवानी स्टील अशा नामांकित उद्येाग व्यवसायाची त्यांनी उभारणी केली.