जावळी

पत्रकार संघ जावळीचा हल्लाबोल – तहसील कार्यलयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

कुडाळ ता. 17 – महाराष्ट्रात दिवसे दिवस पत्रकारांनवर हल्ल्यात वाढ होत आहे .महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असताना .पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ पत्रकार संघ जावली यांनी जिल्हाअध्यक्ष हरीषजी पाटणे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर, माजी अध्यक्ष महेश बारटक्के, दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुका पत्रकार अध्यक्ष वसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली जावली तहसील कार्यलयात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत आज हल्लाबोल केला .

जावली तहसिल कार्यालयात जावली तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येत पत्रकार सरंक्षन कायद्याची होळी तहसिल कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर करण्यात आली. पत्रकार संघ जावळीच्या वतीने तदनंतर तहसिलदार जावली यांना पत्रकारानवर होणा-या हल्ल्याबाबत राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अमंलबजावनी कठोर करावी याबबत निवेदन देण्यात आले . पत्रकार एकजुटीचा विजय असो ,कठोर करा कठोर करा पत्रकार संरंक्षण कायदा कठेर करा या घोषणांनी आसमत दुमुदुमुन गेला.
यावेळी पत्रकार संघ जावळीचे अध्यक्ष वसीम शेख म्हणाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विश्वस्त एस एम देशमुख , जिल्हाअध्यक्ष हरीष पाटणे यांच्या मार्गगर्शनाखाली सुरु असलेला हा लढा राज्यातील पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावनी करत असताना पत्रकारांना मारहाण व धमकवण्याचे प्रकार वाढले आहेत याचा निषेध करत पत्रकार संरक्षण कायद्याची अमंलबजावनी सक्त करत महाराष्ट्रात पत्राकारांनवर वाढते हल्ले वेळीच रोखले जाण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावनी सक्तीची करावी अशी प्रमुख मागणी जावली तालुका अध्यक्ष वसीम शेख यांनी यावेळी व्यक्त केली .


पत्रकार संघ जावळीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यावेळी म्हणाले महाराष्ट्र राज्याला पत्रकारीतेचा दैदीप्यमान असा इतिहास राहीला आहे . दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर , लोकमान्य टीळक , डॅा बाबासाहेब आबेंडकर या विभुतीनी पत्रकाराची विजयी पताका पुढे घेवुन गेले मात्र संध्या लोकशाहीत पत्रकारानवर हल्ले वाढले आहेत विधानसभेत पत्रकार
हल्लाविरोधी कायदा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणला मात्र पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावनी अद्याप झाली नाही पत्रकारानवर वाढते हल्ले रोकण्याकरीता पत्रकार संरक्षण कायदा कठोर करावा अशी मागणी सय्यद यांनी यावेळी केली .जावळी पत्रकार संघाचे मार्गदर्षक दत्ता पवार यांनी देखील पाचोरा येथे पत्रकार संदिप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करत .पत्रकार संरक्षण कायद्याची अमंलबजावनी कठोर करावी अशी मागणी केली. यावेळी पत्रकार संघ जावळीचे सचिव विनोद वेंदे, उपाध्यक्ष शहाजी गुजर, उपाध्यक्ष संतोश बेलोशे पत्रकार संतोष मालुसरे,शरद रांजने, संदिप माने, प्रमोद पंडीत,बापु वाघ, दत्तात्रय पवार जुबेर शेख उपस्थीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button