कुडाळ प्रतिनिधी- जावळी तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या जवळ एका दारू अड्यावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकला असून यामध्ये 56 हजार रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये पवन रामचंद्र वारागडे राहणार कुडाळ याला दारू विक्री करत असताना रंगेहात पकडला. गेल्या २ दिवसापूर्वीच व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने जावळीत फोफावलेल्या अवैध दारूविक्री संबधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, त्यांनतर लगेचच ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात खबऱ्याच्या मार्फत पवनकुमार रामचंद्र वारागडे हा जिल्हा परिषद शाळा कुडाळच्या परिसरामध्ये पवनकुमार रामचंद्र वारगडे हा जिल्हा परिषद शाळा कुडाळच्या परिसरामध्ये अड्ड्यावरून फिरून दारू विकत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली यावरून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार डीजी शिंदे, सनी काळे दिगंबर माने यांनी सापळा रचून पवनकुमार याला दारू विकताना रंगेहात पकडला त्याच्याकडून 56 हजार रुपयांचा दारू मुद्देमाल जप्त केला या कारवाई मध्ये हवालदार डीजे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सनी काळे दिगंबर माने यांनी सहभाग घेतला अधिक तपास पोलीस हवालदार डीजे शिंदे करत आहेत