कुडाळ :जावळी तालुक्याची शैक्षणिक परंपरा चांगली असून येथील शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांसाठी योगदान देत आहेत.शिक्षकांचे काम जिवंत घटकाशी असून स्वयंप्रेरणेने काम होत आहे ही चांगली बाब आहे.सर्वांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न करूयात.जावळीची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांसाठी झटून काम करणाऱ्या शिक्षकांच्या कायम पाठीशी राहीन असे प्रतिपादन जावळीचे नूतन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी व्यक्त केले.
जावली तालुका शिक्षक समितीच्यावतीने मेढा येथे आयोजित स्वागत कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सुरेश शेलार, सुरेश चिकणे ,संपत शेलार,शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन धिरेश गोळे,समितीचे उपाध्यक्ष गजानन वारागडे,चेअरमन रत्नाकर भिलारे,व्हाईस चेअरमन प्रभाकर पाडळे, सत्यवान निकम,शामराव जुनघरे,सुनील शिंदे,सुधाकर दुंदळे,विक्रम सावंत,समीर आगलावे,लक्ष्मण जुनघरे,नथुराम पोफळे,रणजित शिंदे,शैलेश महामुनी,शंकर दळवी,राजेंद्र जाधव,शंकर दळवी,सचिन पवार,प्रमोद शिर्के,सखाराम मालुसरे,गणेश गायकवाड, वसंत ओंबळे, आनंदा पार्टे, संतोष शेलार, धोंडिबा मोरे,मोहन सजगणे ,मंगल पिसाळ,सीमा पार्टे,माया आगलावे, सीमा शिंदे,हेमलता सावंत, शिल्पा कारंजकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष सुरेश चिकणे,समितीचे अध्यक्ष सुरेश पार्टे,शिक्षक पतसंस्था संचालक मंगल पिसाळ,शामराव जुनघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस तानाजी आगुंडे यांनी प्रस्ताविक केले.संजय आटाळे यांनी आभार मानले.