मेढा / प्रतिनिधी
एस .टी. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून ” महाराष्ट्रातील सर्व आगारातून ” स्वच्छ सुंदर आगार, ही स्वच्छता अभियान स्पर्धा ” आयोजीत केली आहे. त्या स्पर्ध मध्ये मेढा आगार लोक सहभागातून राज्यात अग्रेसर ठरेल असा विश्वास मेढा आगाराच्या आगारप्रमुख श्रीमती नीता बाबर – पवार यांनी व्यक्त केला.
आज मेढा आगारामध्ये ” ३ जुन ” हा एस्.टी. महामंडळाच्या ” अमृत महोत्सवी ” वर्धापनदिनामित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी आगार व्यवस्थापक श्रीमती नीता बाबर – पवार बोलत होत्या. अभियाना बाबत अधिक माहिती देताना म्हणाल्या , या अभियानात आगार ,बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान, वृक्षरोपन , बागबगीचा , प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय, सुलभ स्वच्छता गृह , गार्डन, जेष्टांसाठी बसण्यासाठी गार्डन मध्ये बाकडे, ओपन जीम ,लहान मुलांसाठी खेळणी , अशा सुविधा लोकसहभागातून उभ्या करून निसर्ग सौंदर्य लाभलेलेले राज्यातील आदर्श बसस्थानक आपणास निर्माण करायचे आहे. त्यासाठी तालुक्यातील तसेच मेढा शहरातील नागरीकांचा लोकसहभागही तीतकाच महत्वाचा आहे असे सुचित केले.
प्रारंभी मेढ्याचे माजी सरपंच बबनराव वारागडे , प्रतापगड कारखान्याचे संचालक _ आनंदराव जुनघरे, ह.भ.प. अतुल महाराज देशमुख , मजुर फेडरेशनचे संचालक – यशवंत कदम, बबनराव धनावडे, वेण्णामाई चेअरमन – सुरेश पार्टे, प्रकाश कदम, आनंदा परिहार , संदीप पवार, व आगार व्यवस्थापक श्रीमती नीता बाबर- पवार, इत्यादी मान्यवरांचे शुभहस्ते सजवलेल्या एस.टी. गाउयांचे पुजन करण्यात आले. तसेच जेष्ट नागरीकांचे गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच प्रवाशांना साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सहायक वाहतुक अधिक्षक सागर पांढरपटटे , सहायक कार्यशाळा अधिक्षक सुजीत घोरपडे वाहतुक निरीक्षक अजित मुगडे, वाहातुक नियंत्रक सागर तरडे, , अमर पवार , सिताराम मोहिते, मनिष बेंद्रे, प्रवीण पवार , प्रिया देशमुख, वृषाली कुंभार, शरद शेरकर , सुरज काशिद यांच्यासह ,चालक , वाहक, कार्यालयीन कर्मचारी, प्रवाशी उपस्थीत होते,यावेळी सर्वच उपस्थीत मान्यवरांनी मेढा आगाराच्या मोहिमेचे कौतुक करून , जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.वहातुक नियंत्रक सागर तरडे यांनी उपस्थीतांचे स्वागत करून आभार मानले.