मेढा प्रतिनिधी :- जावळीची राजधानी मेढा येथील गोर गरीबांची आर्थिक वाहिनी मेढा सेंटर सोसायटीने सन-२०२२-२३ या अर्थिक वर्षात बॅक पातळीवरील वसूल १००% करुन एक वेगळा आदर्श सोसायटीचे चेअरमन सुरेश दळवी , व्हा चेअरमन काशिनाथ करंजेकर सर्व संचालक मंडळ, सचिव सुनिल आण्णा धनावडे, कर्मचारी निलम सुतार यांनी तालुक्यातील इतर विकास सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे समोर ठेवला आहे.
गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पीक कर्ज वसुली व नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या ३६५ दिवस दिवसांचे आत पीक कर्ज वसुली विकास सोसायटीचे शेतकरी सभासद यांनी दिली तर ०% व्याजदराने सभासद यांना कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते.याची माहिती मेढा सेंटर विकास सोसायटीचे सर्व संचालक मंडळ,सचिव, शाखा विकास अधिकारी व तालुका विक्री अधिकारी यांनी मेढा विकास सोसायटीचे १२ गावातील ( दुर्गम भागातील) सोसायटीचे सभासद यांना स्वतःच्या वाहनाने एक महिन्यात सर्व सभासदांना समक्ष भेटून शासनाच्या वतीने जाहीर झालेल्या ३६५ दिवसांचे आत पूर्ण कर्ज वसुली दिली तर ०% व्याजाचा लाभ मिळू शकतो याची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळाने केलेल्या प्रयत्नांमुळे बॅक पातळीवरील विकास सोसायटीची १००% वसुली होण्यासाठी सहकार्य झाले.
मेढा सेंटर विकास सोसायटीची स्थापना सन १९६० मध्ये झाली. संस्थेचे स्व.मालकीची इमारत असून यापुढे काळात संस्थेचे संचालक मंडळाने नाबार्डचे योजनेतून संस्था उत्पन्न वाढी करिता व्यावसायिक पद्धतीने कामकाज करण्यासाठी प्रयत्न करावयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
संस्थेचे १२ गावातील २२१० सभासद असून कर्जदार ११७५ सभासद आहेत. इतर सभासद यांना सुध्दा विकास सोसायटीचे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संस्थेचे सभासद शेअर्स रक्कम रु १ कोटी २१ लाख इतके असून बॅंकेचे शेअर्स ३२ लाख आहेत. तसेच संस्थेस सन २०२२-२३ या अर्थिक वर्षात साधारण १५ लाख रुपये नफा झाला आहे. संस्थेला कायम “अ ” वर्ग उत्तम नियोजन व वसुली मुळे मिळतो.
तसेच चालू आर्थिक वर्षातील पीक कर्ज वाटप शुभारंभ सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे चेअरमन सुरेश दळवी संचालक सचिन जवळ तुकाराम धनावडे पुंडलीक पार्टे जितीन वेंदे तसेच हणमंत शिंगटे तसेच बैकेचे अधिकारी संस्थेचे सचिव सुनिल धनावडे, सोसायटीचे सभासद यांचे उपस्थित सोमवार पासुन सुरू करण्यात आला.
सदर कार्यक्रमात विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश दळवी व सचिव सुनील धनावडे, यांचा सत्कार ज्ञानदेव रांजणे साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास अण्णासाहेब फरांदे, विभागीय विकास अधिकारी जावळी, विकास अधिकारी दत्तात्रय दुर्गावळे , संजय निकम तालुका विक्री अधिकारी, संतोष देशमुख शाखाप्रमुख तसेच शाखा सेवक उपस्थित होते.