कुडाळ ता. 30 – सातारा जावळीचे आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ ता.जावली येथे श्री प्रसाद बनकर वाई यांचे शिवकालीन शस्त्रास्त्रे व दुर्मिळ वस्तू यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, या प्रदर्शनाचे आयोजन प्रवीण देशमाने, प्रवीण मोरे, व प्रशांत शिंदे व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
आत्ताच्या नविन पिढीला, विद्यार्थ्यांना व तरुणांसाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरणारे असल्याने हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.इतिहासप्रेमींना शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे व गडकोटची छायाचित्रे पाहता यावीत या उद्देशानेया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास विद्यार्थी, युवा, तरूण, महिला, युवती, अशा सर्वच स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात तलवारी,कट्यारी, जांबिया, भाले, बचीर्, ढाली, चिलखत, वाघनखे, गुप्ती, जिरेटोप, जांबिए, खंजीर,कुऱ्हाडी, मुठी, तोफगोळे, धनुष्यबाण आदींचा समावेश होता.
महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख व्हावी, शस्त्रांच्यामाध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडावा याकरिता शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले होते. शिवाजी महाराजांचे कार्य फक्त इतिहासापुरतेच मर्यादित न राहता शिवाजी महाराजांचेकिल्ले, त्यांनी जिंकलेली युध्दे, त्यात वापरलेली शस्त्रे यांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न श्री प्रसाद बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनातूनकरण्यात आला. प्रदर्शनात शिवकालीन जुनी वापरात नसलेली व केवळ अभ्यासासाठी संग्रहितकेलेली ऐतिहासिक २०० हून अधिक शस्त्रे, वस्तू, चित्रे, शिवप्रेमींना पहायला मिळाली. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन करून शिवप्रतिमेचे पुजन केले,त्यांनतर सर्वांसाठी प्रदर्शन पाहण्यास खुले करण्यात आले.
अश्या कार्यक्रमातुन नवीन पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती जाणून घेण्याची प्रेरणानक्कीच मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीरमावळ्यांच्या प्रेरणादायी शौर्याच्या इतिहासातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी याकरिता याप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते हा उदेदश कौतुकास्पद असल्याचे मत आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केले.ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, तलवार, वाघनखे, दांडपट्टा ,कट्यार, भाला ,चिलखत ,जांबिया, बिछवा ,सुरईअशा विविध प्रकारचे शस्त्रास्त्र शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देतील. त्यातूनभारतवर्षाचे आधुनिक मावळे तयार होतील हा प्रदर्शन ठेवणे मागचा उद्देश असल्याचे श्री प्रसादबनकर यांनी सांगितले.तालुक्यातील सर्व शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा पिढी, इतिहास प्रेमी,इतिहासाचे अभ्यासक तथा सर्व महिला व नागरिकांना विविध शिवकालीन शस्त्रास्त्रे दुर्मिळ पुरातन वस्तू पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.