जावळीजिह्वाराजकीय

अर्थसंकल्पात सातारा- जावली मतदारसंघासाठी तब्बल ९० कोटी रुपयांची कामे मंजूर – आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा;

सातारा- सातारा- जावली मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी कोट्यवधीचा निधी खेचून आणणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. सातारा आणि जावली तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण, रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी तब्बल ९० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे
जावली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग पाचगणी कुडाळ रस्ता भाग पाचगणी ते काटवली मधील घाट लांबीतील खचलेल्या रस्त्याची सुधारणा, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे यासाठी २ कोटी, मेढा (वेण्णा चौक) कुसूंबी, सह्याद्रीनगर, कोळघर फाटा अंधारी मुनावळे वाघळी, शेंम्बडी बामणोली रस्ता भाग मेढा ते मोहोट फाटा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी २ कोटी, म्हाते मोहाट गांजे तांबी खरोशी निझरे कामथी वेळे कण्हेर रस्ता भाग सांगवी फाटा ते कुसूंबी या रस्त्याचे रुंदीकरण करणे यासाठी ३ कोटी, मेढा (वेण्णा चौक) कुसूंबी सह्याद्रीनगर कोळघर फाटा अंधारी मुनावळे वाघळी, शेंम्बडी बामणोली रस्ता भागकुसूंबी ते कोळघर रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, राज्य मार्ग १४० ते आंबेघर फाटा पुनवडी, केडंबे बोंडारवाडी रस्ता भाग बाहुले ते बोंडारवाडी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ८० लाख, पाचगणी कुडाळ रस्ता भाग करहर ते हुमगांव रस्त्याची सुधारणा करणे२ कोटी ८५ लाख,

जोर वाई पाचवड मेढा रस्ता भाग आलेवाडी घाट मध्ये संरक्षक भिंत बांधणे व क्रॅश बॅरिअर बसवणे १ कोटी २० लाख, आनेवाडी सायगाव मोरघर वाघेश्वर रस्ता भाग मोरघर ते वाघेश्वर रस्त्याची सुधारणा करणे२ कोटी ३५ लाख, राज्य महामार्ग ४ ते पाचवड कुडाळ मेढा कोळघर अंधारी फळणी मुनावळे वाघळी शेंबडी रस्ता भाग पाचवड ते मेढा आणि भाग मेढा ते शेंबडी रस्त्याची सुधारणा करणेया प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प करणे व अंतिम करणेकरता सल्लागार सेवा पुरविणे ७१ लाख २५ हजार, वालुथ ते करहर रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी, सायगाव ते महिगाव रस्त्याची सुधारणा करणे ३० लाख, प्रजिमा २६ ते एकिव सह्याद्रीनगर रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ४० लाख, सायघर कावडी व कावडी ते हातगेघर रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी, राज्य मार्ग १४० ते नांदगणे पुनवडी रस्त्यावरील पुलाच्या पोहोचमार्गाचे काम व संरक्षक भिंतीचे काम करणे १ कोटी, काटवली ते रोहाटवस्ती रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख, केळघर ते कुरळोशी रस्त्याची सुधारणा करणे ९० लाख, प्रजिमा १९ ते नेवेकरवाडी रस्त्याची सुधारणा करणे ३० लाख, एकिव दुंद मालचौंडी रस्त्याची सुधारणा करणे७० लाख आणि म्हाते भामघर रस्त्याची सुधारणा करणेयासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.


सातारा तालुक्यातील शेंद्रे सातारा बाह्यवळण रस्ता भाग शेंद्रे तो सोनगाव फाटा रस्त्याची सुधारणा करणे यासाठी५ कोटी ५० लाख, लिंबखिंड खिंडवाडी रस्ता भाग लिंबखिंड ते रामनगर रस्त्याची सुधारणा करणे यासाठी२ कोटी ५० लाख, आसनगाव कुसवडे निनाम सोनापूर गणेशखिंड ते कोंजावडे रस्ता भाग कुमठे फाटा ते निनाम रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी, प्रजिमा २९ परळी बनघर कुस खु. कुस बु. खड्गाव ताकवली निगुडमाळ निटरल कातवडी केळवली धनगरवाडी धावली ते प्रजिमा २६ भाग परळी फाटा ते बनघर रस्त्याची सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख, भोंदवडे अंबवडे बु. सायळी वडगांव सावली कुरुलबाजी कुडेघर रोहोट पाटेघर आलवडी धावली रस्ता भाग दहिवड ते लुमनेखोल रस्त्याची सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख, भोंदवडे अंबवडे बु. सायळी वडगांव सावली कुरुलबाजी कुडेघर रोहोट पाटेघर आलवडी धावली रस्ता भाग लुमनेखोल ते सावली रस्त्याची सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख, परळी बनघर कुस खु. कुस बु. खड्गाव ताकवली निगुडमाळ नित्रळ कातवडी केळवली धनगरवाडी धावली रस्ता भाग जळकेवाडी ते धावली रस्त्याची सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख, महामार्ग ४ ते शेंद्रे वेचले डोळेगाव भाटमरळी कुसवडे नरेवाडी रस्ता भाग भाटमरळी ते कुसवडे रस्त्याची सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला आहे.

महामार्ग ४ ते शेंद्रे वेचले डोळेगाव भाटमरळी कुसवडे नरेवाडी रस्ता शेंद्रे ते वेचले मधील मोठ्या पुलाचे आणि डोळेगाव येथील लहान पुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन आणि सुधारणा करणे २ कोटी, पोगरवाडी आरे दरे रेवंडे वावदरे राजापुरी भाग दरे ते रेवंडे घाट ची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, अंबवडे बु. करंजे शिंदेवाडी मस्करवाडी लावंघर अनावळे रस्ता भाग अंबवडे ते चिकणेवाडी चे रुंदीकरण सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, भोंदवडे अंबवडे बु. सायळी वडगांव सावली कुरुलबाजी कुडेघर रोहोट पाटेघर आलवडी धावली रस्ता भाग भोंदवडे ते काळोशी फाटा ची सुधारणा करणे १ कोटी ८० लाख, लिंब शेरी रस्त्याची सुधारणा करणे ४० लाख, लिंब आवळीमाथा रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी, कुशी नागेवाडी रस्त्याची सुधारणा करणे२० लाख, हिरापूर जोड रस्त्याची सुधारणा करणे४० लाख, शाहूपुरी अंबेदरे रस्त्याची सुधारणा करणे६० लाख, आवाडवाडी जोड रस्त्याची सुधारणा करणे८० लाख, दरे बु. ते कोंडवे रस्त्याची सुधारणा करणे२५ लाख, आटाळी पारंबे रस्त्याची सुधारणा करणे५० लाख, आंबाणी जोड रस्त्याची सुधारणा करणे ३० लाख, सांबरवाडी रस्त्याची सुधारणा करणे३० लाख, यवतेश्वर जोड रस्त्याची सुधारणा करणे ६० लाख, काळोशी आंबवडे रस्त्याची सुधारणा करणे ७० लाख, चिकणेवाडी मनवेवाडी सावंतवाडी शिंदेघर रस्ता भाग मनवेवाडी सावंतवाडी शिंदेघर रस्त्याची सुधारणा करणे ८० लाख, चिकणेवाडी रस्त्याची सुधारणा करणे१ कोटी, तांबी ते भांबवली रस्त्याची सुधारणा करणे ९० लाख, सज्जनगड जोड रस्त्याची सुधारणा करणे ७० लाख, साठेवाडी जोड रस्त्याची सुधारणा करणे २५ लाख, जकातवाडी शहापूर रस्त्याची सुधारणा करणे ६० लाख, वेचले शिवाजीनगर करंडी रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख, शेरेवाडी जोड रस्त्याची सुधारणा करणे ३० लाख, आसनगाव परमाळे रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ४० लाख, बेंडवाडी परमाळे पिलाणीवाडी नरेवाडी कौंदणी पिरेवाडी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी २० लाख, उपाली ते शेळकेवाडी रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख, वेचले शेळकेवाडी रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख, बोरगाव जोड रस्त्याची सुधारणा करणे २० लाख, भरतगाववाडी ते भरतगाव रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. घाटवन जोड रस्त्याची सुधारणा करणे ३० लाख, बोंडारवाडी रस्त्याची सुधारणा करणे ४० लाख, बोरगाव शेतीशाळा रस्त्याची सुधारणा करणे ६० लाख, ताकवली जोड रस्त्याची सुधारणा करणे ५० लाख, सातारा गजवडी ठोसेघर चाळकेवाडी पाटण रस्ता भाग बोगदा ते सातारा तालुका हद्द ची सुधारणा करणे या प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प तयार करणे आणि अंतिम करणेसाठी सल्लागार सेवा पुरविणे या कामासाठी ३३ लाख १३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया आणि इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे सुरु करा, कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पर्यटन वाढीला मिळणार चालना
दरम्यान, सातारा कास रस्त्याच्या धर्तीवर सातारा आणि जावली तालुक्यातील दोन रस्त्यांची हायब्रीड अन्युइटी मॉडेल अंतर्गत सुधारणा करण्यासाठी भरगोस निधी उपलब्ध झाला आहे. सातारा तालुक्यातील गजवडी ठोसेघर चाळकेवाडी पाटण रस्ता भाग बोगदा ते सातारा तालुका हद्द या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुधारणा करणे, जावली तालुक्यातील राज्य महामार्ग ४ ते पाचवड कुडाळ मेढा कोळघर अंधारी फळणी मुनावळे वाघळी शेंबडी ते महाबळेश्वर हद्द या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुधारणा करणे यासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. सातारा चाळकेवाडी, ठोसेघर रस्त्यामुळे थेट कोकणात उतरणे सोयीचे होणार आहे. या दोन्ही रस्त्यांमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार असून पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button