कुडाळ ता. 8 – जावली तालुक्यातील प्रत्येक गावात असंख्य विकासकामे करून त्या- त्या गावातील समस्या सोडवल्या आहेत. आनेवाडी गावातही अनेक विकासकामे मार्गी लावली असून यापुढेही आनेवाडी गावात सर्व प्रकारची विकासकामे केली जातील. आनेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
आनेवाडी ता. जावली येथे वि.का.स.सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे, जेष्ठ नेते दादा पाटील, माजी चेअरमन अंकुशराव शिवणकर, सोसायटीचे चेअरमन विवेक पवार, बाळासाहेब निकम, राजेंद्र पाटील, मोहन धुमाळ, प्रविण देशमाने, मुरलीधर शिंदे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन जगताप आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे पुढे बोलताना म्हणाले, आनेवाडी पंचक्रोशीतील मर्ढे येथे कृष्णानदी काठी स्मशानभूमी उभारणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याच विचाराचे सदस्य निवडूण येतील, यात कोणीही शंका बाळगू नये. निवडणुकीपुरते उगवणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. आनेवाडीसह पंचक्रोशीतील सर्वच गावांचा आगामी काळात कायापालट करू. सर्वांनी एकीने राहून आपल्या गावाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
ऍड. मनोहर फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाबा साळेकर, संजय निकम, शरद निकम, सुहास भोसले, शेखर हणमंत फरांदे, अशोक आण्णा फरांदे, सुभाष दादा फरांदे, शिवाजी आबा फरांदे, मुरलीधर शिंदे, सदाशिव बापू फरांदे, शामआण्णा फरांदे, बबनराव फरांदे, रमेश जगताप, यशवंत फरांदे, संतोष गोरे, सागर फरांदे, अतुल गोरे, गुलाब फरांदे, अतुल फरांदे, मनोज फरांदे, कुमार फरांदे, अतिश फरांदे, अमित फरांदे, दिपक फरांदे, प्रविण शिंदे, श्रीनिवास फरांदे, संदेश साळेकर, अथर्व फरांदे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.