
मेढा प्रतिनिधी
जावळीची राजधानी मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय ( तालुका अ वर्ग ) या संस्थेच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध पुरस्कार वितरण सोहळा ,व इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव धनंजय पवार, ग्रंथपाल सौ. आशा मगरे यांनी दिली.

जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली , व मान्यवरांचे उपस्थीतीमध्ये हा कार्यक्रम ८ मार्च रोजी दुपारी २वा. संस्थेच्या विजयाताई थत्ते सभागृहात संपन्न होणार आहे. प्रारंभी शिवव्याख्याती कु. सायली प्रमोद भोसले ( पाटील ) हिचे ” मासाहेब जिजाऊ ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. वाचनालयाचे वतीने दिला जाणारा या वर्षीचा मानाचा ” जीवन गौरव पुरस्कार ” साहेबराव साळूंखे ( गुरूजी) यांना जाहिर करण्यात आला आहे. आदर्श शिक्षिका स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे यांचे स्मरणार्थ आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार . बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीचे समन्वयक स्व. विजयराव मोकाशी यांना मरणोत्तर जाहिर झाला आहे.

तर आदर्श सामाजिक कार्यकर्ती -सौ . कविता शांताराम धनावडे यांना, तसेच वाचनालयाचे वतीने दिला जाणारा डॉ . एस .आर. रंगनाथन जिल्हास्तरीय ” आदर्श ग्रंथपाल ” श्रीमती कुमुदिनी फाळके – ग्रंथपाल नवयुग वाचनालय निनाम पाडळी. ता. जि. सातारा यांना तसेच कै. शामराव बापुराव क्षिरसागर ( गुरुजी) “जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार “_ रविंद्र झुटिंग – अश्वमेघ वाचनालय सातारा यांना ,आदर्श शिक्षिका स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षिका पुरस्कार -“सौ . मुक्ता हणमंतराव धनावडे ( शिक्षिका) करंजे ता. जावली यांना,

स्व. जनाबाई मारूती पार्टे ” आदर्श माता पुरस्कार” सौ . रजिया मुबारक शेख रा. मेढा यांना तर स्व. सावित्री सिताराम थत्ते ” आदर्श महिला वाचक पुरस्कार ” सौ . शिल्पा शरद गांधी, सौ . कल्याणी अतुल इगावे, सौ . रेश्मा भाऊसाहेब बेलोटे यांना जाहिर झाला आहे.सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
सदरच्या कार्येक्रमास संस्थेचे सभासद हितचिंतक व ग्रामस्थ, महिला भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थीत राहावे . असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांचे वतीने करण्यात आले आहे.

