कुडाळ ता. 2- खास महिलादिन सप्ताहाचे आौचित्य साधून कुडाळ ता. जावली येथे उद्या शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता जिल्हा परिषद प्रातमिक केंद्र शाळा कुडाळ ता.जावली या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते तथा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे (सांगली) यांचे व्याख्यान कार्यक्रम आहे तरी आपापल्या किशोरवयीन मुलींना घेऊन विशेष करून माता भगिनी वपालकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक ग्रामस्थ मंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे यामुळे आपल्या किशोरवयीन मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. चौकाचौकांनी शाळा, क्लासेस, कॉलेज समोर टवाळखोर रोड रोमिओ मुलींचा पाठलाग करत असताना आपण नेहमी पाहतो आणि म्हणूनच यावर एकमेव उपाय म्हणजे आपल्या मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप देणे तसेच अनुचित प्रकार कुठेतरी थांबेल या हेतूने महिला व मुलींचे समुपदेशन काळाची गरज या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समजप्रबोधनकार वसंत हंकारे (सांगली) यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ ता. जावली येथे उद्या शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुडाळ ता.जावली या ठिकाणी केले आहे. तरी कुडाळ आणि परिसरातील तमाम माता पालकांनी आपापल्या शालेय महाविद्यालयीन किशोरवयीन मुलींना घेऊन या व्याख्यान कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ग्रामस्थ मंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुप्रसिध्द युवा व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाची ज्यांना माहिती नाही त्यांनी एक नमुना म्हणून खालील व्हिडिओ पहावा…….
आपणा सर्व सुज्ञ नागरिकांना नम्र विनंती….
प्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे सर यांचे काळजाला भिडणारे आणि ह्रदयाला पाझर फोडणारे प्रबोधनपर व्याख्यान आपल्या कुडाळ मध्ये शुक्रवार दि.३ मार्च २०२३रोजी दु.३ ते ६ यावेळेत प्राथमिक शाळा कुडाळ येथे आयोजित केले आहे. सदर कार्यक्रम लोकवर्गणीतून करणार आहोत.तरी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आपले कर्तव्य समजुनसढळ हाताने यथाशक्ती मदत करावी.
मदतीसाठी फोन पे संपर्क :-
महेंद्र शिंदे – 9421118008, अमोल शिंदे- 9657999890, महेश बारटक्के-9922913458, प्रमोद खटावकर-9423874054 अविनाश गोंधळी- 8888311108, सचिन वारागडे-9011866445