मेढा प्रतिनिधी :- जावळी क्रिकेट चा महासंग्राम श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित जावळी प्रीमिअर लीग 2023 चे उद्घाटन ४०+ मैदान घनसोली नवि मुंबई येथ ऐरोली चे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
एक मैदान , 12 संघ ,180 योद्दे, यांचेमध्ये होणार महासंग्राम.जावळी प्रीमिअर लीग 2023 चे आयोजन 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत केले जाणार असुन यामध्ये 12 संघ सहभागी झाले असून 180 खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
या सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक 77,777 चषक आणि बाईक, द्वितीय पारितोषिक 55,555 चषक आणि गोल्ड चेन, तृतीय पारितोषिक 33,333 आणि चषक गोल्ड चैन, चतुर्थ पारितोषीक 22,222 आणि चषक असणार आहे. तसेच सामनाविर साठी स्पोर्टस् सायकल व आकर्षक चषक, उत्कृष्ठ फलंदाज एल ई डि टिव्ही, उत्कृष्ठ गोलंदाज एल इ डी टिव्ही, उत्कष्ट श्रेत्ररक्षक सायकल, सामनाविर रोख रक्कम आकर्षक चषक ,गेम चेंजर रोख रक्कम आकर्षक चषक,सामन्याचा फायटर रोख रक्कम आकर्षक चषक बक्षीस मिळणार आहे
खेळाचे सामन्यांना मी कायम हजर असतो तेव्हा खेळासोबत सर्वांनी आपले करीअर घडवा क्रिकेट खेळ खेळून ही अधिकारी होता येत याच ज्वलंत उदाहरण आय पि एस अधिकारी ओमकार पवार आहे असे संदिप नाईक म्हणाले ओमकार पवार यांचा सन्मान संदिप नाईक यांचे हस्ते करणेत आला
सदर कार्यक्रमास संदिपजी नाईक राजेंद्र धनावडे ज्ञानेश्वर दळवी व बाबाराजे प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते