जावळीजिह्वाराजकीय

जावली तालुका खादी ग्रामोदयोग संस्थेची निवडणूक बिनविरोध –

मेढा प्रतिनिधी – कारागीरांची आर्थिक जिवनदायिनी असलेल्या जावली तालुका ग्रामिण औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होताना विरोधी उमेदवारांनी संस्था वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य करीत स्वतःचे उमेदवारी अर्ज माघार घेवुन बलीदान दिल्याने संस्था बिनविरोध करण्यात यश आले आहे.
जावलीतील ग्रामोद्योग संस्थेच्या पंचवार्षीक निवडणूकी मध्ये ११ जागांसाठी २३ जनांचे अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत एक ही अर्ज अपात्र झाला नसल्यामुळे निवडणूक अटळ समजली जात होती.

माघारीचा अखेरचा दिवस असताना आणि एकही अर्ज माघार नसताना संस्थेचे माजी चेअरमन संजय जुनघरे व बाजार समितीचे संचालक शिवाजी गोरे यांनी अखेरच्या क्षणी संपूर्ण संस्था बिनविरोध करण्यात यश मिळविले.
संस्थेच्या हितासाठी शिवाजी गोरे, जगन्नाथ चिकणे, संतोष करंजेकर, सुभाष चिकणे, विजय सपकाळ, संजय जुनघरे, अशोक गोळे, सौ. आशा शिंदे, विठ्ठल कोकरे, सौ. सुशिला भोसले यांनी अर्ज माघार घेवुन संस्था बिनविरोध होण्यासाठी योगदान दिले.
तालुक्यातील सर्वांच्या नजरा या निवडणूकीकडे लागल्या असताना शेवटच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतल्याने सोमनाथ साखरे, संतोष कासुर्डे, राजेंद्र गोळे, रघुनाथ जवळ, मधुकर पवार, विजय खरात, सौ. पुष्पा चिकणे, कल्पना कदम, नितीन सोनटक्के, संजय कांबळे आणि चित्तरंजन गोरे यांचे अर्ज शिल्लक राहील्याने संस्था बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश देशमुख यांनी कामकाज पाहीले व ११ जागांसाठी ११च अर्ज शिल्लक राहीले असल्याचे सांगीतले.

संजय जुनघरे, माजी चेअरमन
जावळी तालुक्यातील संपूर्ण कारागीरांची आर्थिक जिवनदायिनी असलेल्या जावली तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेत राजकीय जोडे बाजुला ठेवून सर्व सभासदांनी एकत्रित येऊन सहकार्य केल्यामुळे निवडणूक बिनविरोध करणेत यश आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button