क्राईमजिह्वा

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून – वाई तालुक्यात खळबळ

कुडाळ (प्रतिनिधी) – परखंदीच्या शिवारात सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळतात वाई पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेहाची ओळख पोलिसांनी लगेच पटवली असून खून झालेला युवक हा खानापूर येथील अभिषेक रमेश जाधव (वय 20) याचा असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान खानापूर मध्ये तणावाचे वातावरण झालेले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, अशी शुक्रवारी सकाळी परखंदी गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता व काही मृतदेहाच्या जवळील कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा येथे नेण्यात आलामात्र युवक युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे खानापूर येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथेही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अद्यापही या खून प्रकरणातील संशयतांची नावे निष्पन्न झालेली नाहीत घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हेही दाखल झाल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button