
कुडाळ (प्रतिनिधी) – हुमगांव विभागातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कनेक्शन तोडू नयेत यासाठी जावली तालुक्यातील विविध पदाधिकारी यांनी मेढा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले, यावेळी शेतकरी संघटनेचे कमलाकर भोसले, भारतीय जनता पार्टीचे तालुकाअध्यक्ष श्रीहरी गोळे, भाजपा नगरसेवक विकास देशपांडे, गणेश निकम,हुमगांवचे माजी सरपंच भाऊसाहेब जंगम,अजय शिर्के, मारुती शिर्के,विनायक शेलार,लहू भोसले, राजेश महाडिक,अनिल चव्हाण,रतन शेलार, विलास महाडिक, समीर शेलार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज वितरणच्या स्थानिक वायरमन यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे अशी मागणी गणेश निकम यांनी केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे वीज बिल थकले आहे, त्यांचे शेवटच्या महिन्याचे वीज बिल भरून कनेक्शन पूर्ववत करावे. या निर्णयाची जावळीत अंमलबजावणी करावी अशी मागणी तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी केली. त्यावर वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्याबबत उपाभियंता बनकर साहेब यांनी मान्यता दिली. उरलेले बिल ऊस बिले मिळाल्या नंतर भरावीत. आणि पावसाळ्याच्या दिवसातील वाढून आलेले वीज बिले योग्य पध्दतीने तपासून कमी करून दिले जाईल असे आश्वासनही श्री बनकर यांनी शेतकरी व भाजपा पदाधिकारी यांना दिले. तसेच तात्काळ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून देण्याच्या सूचनाही हुमगांव -करहर विभागातील वीज कर्मचारी यांना दिल्या.


