कुडाळ (प्रतिनिधी) – जावली तालुक्यातील आज तक व दैनिक पुढारीचे पत्रकार इम्तियाज मुजावर यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे.. धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला तात्काळ शोधून अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघ जावळीचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्यांनी मेढा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे
”जावली तालुक्यातील दारू धंदे बंद करण्याच्या भानगडीत पडू नको जिवंत राहणार नाही” अशी धमकी देण्यात आलीये.. सर्व दारू व्यवसायिकांनी पोस्टद्वारे ही धमकी पाठवली आहे.. असे पत्र पाठवणाऱ्याचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी शोधून काढावा अशी मागणी देखील निवेदनात केली आहे सदर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राद्वारे व या पाठीमागे नेमकी कोण आहे याचा कसून शोध घ्यावा
या घटनेचा पत्रकार संघ जावळीच्या सर्व सदस्यांनी सातारा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला जात असून दारू व्यवसायिकांनी ही धमकी दिली असल्याने त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीवर तात्काळ मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी अज्ञातावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पत्रकार इम्तियाज मुजावर यांना त्यांच्या पत्त्यावर सर्व दारू व्यवसायिक असा उल्लेख करून आत मध्ये धमकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे.. या घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय.. असे अभिवचन देखील मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिले यावेळी पत्रकार संघ जावळीचे अध्यक्ष वसीम शेख उपाध्यक्ष संतोष बेलोशे सचिव विनोद वेंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते