कुडाळ (प्रतिनिधी) – सचिन वारागडे
जावली तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती बुधवारीउत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी दिवसभर भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अभिषेक, गणेश याग, सत्यनारायण पुजा, होमहवन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने करण्यात आले होते.
कुडाळ येथील बाजारपेठेतील मानाचा महागणपती नटराज गणेश मंदिर, गजराज मित्र मंडळ येथे गणेश जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती,
यावेळी नटराज मंडळाच्या नव्याने रंगकाम केलेल्या गणेशमूर्तीची व चांदीच्या आभूषणाची अनेकांनी प्रशंसा केली. या वेळी सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, मेढ्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगांवकर,भुमिअभिलेख अधिकारी गोरखनाथ जाधव, महावितरणचे अभियंता श्री बनकर यांच्यासह विविधक्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन दर्शन घेतले, यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कारहीकरण्यात आला. याशिवाय गणेश जंयतीनिमित्त मंदिरामध्ये दिवभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरामध्ये सकाळपासूनच दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणेश मंदिरामध्ये दर्शनासह सायंकाळी महाप्रसादासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी धार्मिक कार्यक्रमांसोबतच सुश्राव्य भजनाचाही कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
नटराज मंडळांचा नटराज फेस्टीव्ह रेकाँर्ड ब्रेक गर्दीसह उत्साहात
तालुक्यातील एकमेव फेस्टीव्हल कुडाळ येथील नटराज युवक मंडळाच्या वतीने घेण्यात येतो,यावषीही मंगऴवार ता.24 रोजी घेण्यात आलेला नटराज फेस्टीव्हल उत्साहात पार पडला, यावेळी ग्रामिण भागातील जनतेसाठी मनोरंजनाच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या फेस्टीव्हला अभूतपुर्व गर्दीने प्रतिसाद मिळाला, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी रेकाँर्ड ब्रेक गर्दी झाली होती, या फेस्टीव्हलचे उदघाटन सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, मेढ्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगांवकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा गीताताई लोखंडे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, सरपंच स्वगता बोराटे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,या फेस्टीव्हलचे आयोजन साैरभबाबा शिंदे यांच्या साैजन्याने करण्यात आले होते, यावेळी तालुक्यात नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगावकर यांचा आमदार भोसले यांच्या वतीने तालुक्यातील पहिला जाहीर सत्कार करण्यात आला.