मेढा प्रतिनिधी :- जावळीच्या राजधानीत मेढा पोलीस स्टेशनला नविनच रुजु झालेले मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तालुक्यात दारू मटका , विरोधी धडका चालु केला आहे शनिवार दि.२१/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.१० वा. चे सुमारास श्री. संतोष तासगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली असता तात्काळ त्यांची टिम रवाना होवून मौजे कुडाळ ता. जावली जि.सातारा गावचे हद्दीत पाचवड ते करहर जाणारे रोडवर एच. पी. पेट्रोल पंपाचे समोर बातंमीचे ठिकाणी थांबलेलो असताना ०६.५० वा. चे सुमारास पाचवड बाजुकडून एक पांढरे रंगाची बलेरो गाडी येत असताना दिसल्याने सदरचे वाहन थांबवून सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू संत्रा कंपनिच्या एकुन ९१,७०० /- रू. किं.चा प्रोव्ही माल बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने चोरटी वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने कारवाई करण्यात आली.
सदर वाहनावरील चालक नामे तुषार ज्ञानदेव निकम वय ३२ वर्षे रा. सोनगीरवाडी वाई हा श्रीकांत सुधाकर सावंत रा. सोनगीरवाडी वाई याचेकरीता वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेवून तसेच त्याचे कब्जात मिळुन आलेला प्रोव्ही मुद्देमाल व महेंद्रा बलेरो गाडी (नंबर प्लेट नसलेली ) असा एकुन ७,९१,०००/- रू. किं.ची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.सदर कारवाई मध्ये मेढा पोलीस ठाणेचे श्री. संतोष तासगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक , पो.काँ. सनी काळे पो. कॉ. दिगंबर माने यांनी सहभाग घेतला असून सदर गुन्ह्याचा तपास डी. जी. शिंदे पोलीस हवालदार हे करीत आहेत. सदर कारवाईचे संपुर्ण तालुक्यात कौतुक होत आहे