
कुडाळ (प्रतिनिधी) दि. 14 – आखाडे (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हेमलता बापूसाहेब शिंदे यांची आज एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

आखाडे ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली आसून यामध्ये थेट सरपंचपदी सखाराम गायकवाड यांची निवड झाली. सरपंच सखाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. या निवडी वेळी उपसरपंच पदासाठी हेमलता बापूसाहेब शिंदे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक श्री गायकवाड यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित सदस्य दत्तात्रय शंकर अमराळे, राजेंद्र रामराव शेलार, विवेक शांताराम शिंदे, वंदना सत्यवान शिंदे, दीपाली समीर शेलार, शैला अरुण जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.नवं निर्वाचित उपसरपंच हेमलता शिंदे यांनी निवडीनंतर सांगितले इतर सदस्यानी माझेवर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पेलणार असून पुढील काळात सर्व सदस्य आणि ग्रामस्थांना बरोबर घेऊन उर्वरित गावाच्या विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी सरपंचाच्या मदतीने पाठपूरावा करणार आहे.
उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हेमलता बापूसाहेब शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
