कुडाळ ता.4 – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती बालक्रीडा तालुकास्तरीय स्पर्धेत कुडाळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. लहान व मोठ्या गटात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारात शाळेतील खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ केला असून त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.
धावणे मोठा गटआर्यन वारागडे ८०० मी. प्रथम, श्रेया सावंत ६०० मी. द्वीतीय, अभिजित मदने ४०० मी.द्वीतीय, लांबउडी वेदांत कारळे द्वीतीय, कुस्ती स्पर्धेत अनुष्का शेवते (३५ कि. ग्रॅ.) प्रथम लहान गटात बुध्दीबळ स्पर्धेत स्वामीनी भस्मे द्वीतीय, सोहम जमदाडे प्रथम, या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ केला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.डॉ .बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत स्वराज पवार यानेजिल्ह्यात तृतीय, निबंध स्पर्धेत द्वीतीय, आर्या भिलारे जिल्ह्यात द्वीतीय, सावित्रीबाई फुलेचित्रकला स्पर्धेत पल्लवी गावडे प्रथम, निबंध स्पर्धेत सिद्धी पोफळे द्वीतीय, हस्ताक्षरमध्ये सिध्दीपोफळे तृतीय, कुस्ती (४५ किग्र) साक्षी शेळके तृतीय, सई जाधव (३२ किग्रॅ) तृतीय क्रमांकमिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच लहान गट रस्सीखेच, रिलेमध्ये कुडाळ शाळाउपविजेता ठरली आहे. प्रश्नमंजुषेत लहान व मोठ्या गटाने तृतीय क्रमांक मिळवला असून याविद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पनातोडरमल, विस्तारधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापिका जयश्रीगायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ कुडाळ यांनी अभिनंदन केले .