मेढा प्रतिनिधी दिनांक 1: – आपल्या जिवनातील पहीले गुरू आई वडील . म्हणून नववर्षानिमित्त शैक्षणिक सेवा केंद्राच्या एन.एन. शहा हायस्कूल हातगेघर ता.जावली येथे माता-पिता पाद्य पूजन व पालक विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.झाला. संस्थेचे सहसचिव श्री संजीव माने सरांच्या व श्री योग सेवा समिती सातारा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यत आला. पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधअनुकरणात भारतीय संस्कृती लोप पावत असताना विद्यार्थी व पालकांवर योग्य संस्कार व्हावेत मुलांना आई- वडीलांप्रती आदर निर्माण व्हावा. व भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे.या उद्दात हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश गोळे, सचिव श्रीहरी गोळै, संचालक तुकाराम गोळे, अर्जून गोळे, जगन्नाथ गोळे, ज्ञानेश्वर गोळे, सरपंच प्रमिलाकाकी गोळे, उपसरपंच शंकर गोळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा गोळे, कमल गोळे, सारिका गोळे, प्रभारी मुख्याध्यापक बोरकर सर, जुनघरे सर, बाबुराव गोळे सर तसेच श्री योग सेवा समिती साताराचे केंजळे सर, दळवी सर व आसाराम बापूंचे अनुयायी यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घरात आनंदी व व्यसनमुक्त अभ्यासाच्या वेळी टिव्ही मोबाईल बंद ठेवण्याची शपथ घेतली.