कुडाळ दिनांक- 20 (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील मोरघर येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखालील व माथाडी कामगार व युवानेतृत्व सुरेश (तात्या) गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील न्यू परिवर्तन विकास पॅनलला सर्वच्या सर्व आठ जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली आहे, तर त्यांच्या विरोधी गटाच्या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सकाळी 11 वाजता निकाल लागताच सर्व विजयी उमेदवारांसह न्यू परिवर्तन विकास पॅनेलच्या सर्व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला, मेढा येथील जल्लोषानंतर सर्व विजयी उमेदवारांनी मोरघर येथे जाऊन ग्रामदैवताचे दर्शन घेतले, त्यांनतर गावातून न्यू परिवर्तन विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करित संपुर्ण गावातून विजयी मिरवणुक काढली. तसेच गावातील मतदरांचे आभार मानले. विजयी मिरवणुकीनंतर बोलताना माथाडी कामगार व युवानेतृत्व सुरेश (तात्या) गायकवाड बोलताना म्हणाले, मोरघर ग्रामस्थांनी न्यू परिवर्तन विकास पॅनलवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून दिले आहे, तो विश्वास आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आगामी पाच वर्षात गावात विकासकामांची गंगा पोहचवून सार्थ करून दाखवू व मोरघरचा विकास करून गावाचा कायापालट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मोरघर ग्रामस्थांनी सर्वच्या सर्व जागा निवडून देऊन एकमुखी कारभार करण्याची दिलेली संधी आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन सार्थ करून दाखवणार आहे, मोरघर गावाला विकासाच्या माध्यमातून तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलैोकीक मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू, या निवडणुकीत ज्या ज्ञात अज्ञात सर्वांनी मदत केली त्या सर्व ग्रामस्थांचे व दिवस रात्र झटणाऱ्या सर्व युवा कार्यकत्यार्ंचे आभारही यानिमित्ताने मानत असल्याचे नमूद केले. यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ, युवा व महिला आदींसह ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जल्लोष साजरा करताना शशिकांत शिंदे साहेबांचा विजय असो, आठ झिरो सुरेश तात्या हिरो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला,