कुडाळ दिनांक -18 (प्रतिनिधी) – गवडी ता . जावली गावाचे हद्दीमध्ये बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुटखा व पान मसाल विक्री करताना मेढा पोलीसांनी धडक कारवाई करत २ लाख १९ हजार १०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शासनाकडून बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गुटखा विक्रि होत असल्याबाबतची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने मिळाली होती,
त्यानुसार गवडी ता . जावली गावाचे हद्दीमध्ये बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुटखा व पान मसाल विक्री करताना मेढा पोलीसांनी धडक कारवाई करत २ लाख १९ हजार १०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सातारा येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अनिल पवार यांनी मेढा पोलीस स्टेशन यांना फिर्याद दिली असून समद अक्तार पठाण ( वय २८ वर्ष) रा. सातारा, व शंकर मधूकर मोरे (वय ३२) रा. पाचवड या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र शासन उत्पादन विक्री व वहातुक व साठा करण्यासाठी प्रतिबंध केलेल्या विविध प्रकारचे ब्रॅण्ड पान मसाला, सुंगधी तंबाखु विक्री हेतु साठा केला असल्यामुळे गुन्हा दाखल करून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. यामध्ये अॅव्हेंजर गाडी क्र. MH 11 cc 1777 व अॅक्टिव्हा MH11DF6015 या दोन गाडयांसह दोन लाख एकोणीस हजार शंभर रूपयाचा मुद्देमाल जप्त करऩ्यात आला आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस हवालदार. श्री. जाधव व सहकारी करीत आहेत.