कुडाळ दिनांक 6 – ऊस म्हणजे उत्पादनाची किमान हमी देणारे पीक म्हणुन आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, उत्तम नियोजन, योग्य अंतर व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर सुरु व पुर्व हंगामी तसेच खोडवा ऊसाचे एकरी ८० ते १०० टनाचे लक्ष ठेऊन आपणही ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतात यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने बुधवार ता.7 डिसेंबर 2022 रोजी कुडाळ ता. जावळी येथील विकास सेवा सोसायटीच्या मुख्य कार्यालयात सकाळी 10 वाजता ऊस पिक परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या परिसंवादासाठी विशेष उपस्थिती म्हणून मा.आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा-जावळी विधानसभा मतदार संघ तसेच श्री. रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी (मेढा), श्री. मालोजीराव पिराजीराव शिंदे चेअरमन, कुडाळ विकास सेवा सोसायटी, श्री. काशिनाथ शंकर शेवते व्हा.चेअरमन, कुडाळ विकास सेवा सोसायटी, डॉ. विजय माळी वरिष्ट ऊस पिक शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. आदी मान्यवर उपस्तित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक श्री. संतोष डांगे विभागीय व्यवस्थापक, जैन इरिगेशन सिस्टीम्स्लि . श्री. पांडुरंग खाडे, कृषी सहाय्यक, श्री. हरी देशमुख क्षेत्रिय व्यवस्थापक जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. आदींचे मार्गदर्शन होणार आहे,