कुडाळ दिनांक – 6 – कुडाळ ता. जावळी येथे बुधवार ता. 1 डिसेंबर 2022 ते 07 डिसेंबर 2022 या कालावधीत भव्य गुरूचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षी पारायणाचे १२ वे वर्षे असून सालाबादप्रमाणे याहीवर्षी कुडाळसह उडतारे, करहर व जावळी तालुक्यातील विवध भागातून येथे वाचक पारायणाला येत आहेत, दररोज पहाटे ५ वाजता या पारायणाला सुरूवात होत असून सर्व वाचक पहाटे हजर राहून सेवा करत आहेत. यावर्षी पारायण सेहळ्यात ७० वाचक गुरूचरित्र ग्रंथाचे वाचण करत असुन या पारायणाचे व्यासपीठ चालक म्हणून डाँ राजेंद्र माने हे निरूपणाचे कार्य करत आहेत. दररोज पहाटे सूरू होणारे पारायण सकाळी साडे आठ वाजेपर्यंत सूरू असते त्यानंतर आरती होऊन त्या दिवसाची सांगता करण्यात येते.
कुडाळ येथे मोरे वस्ती येथील शिंदे यांच्या श्री दत्त् मंदीरात हे पारायण सूरू असून मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, या पारायण सोहळ्यामुळे संपुर्ण गावात भक्तीमय वातावरण झाले आहे. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी श्री राजेंद्र शिंदे, श्री अमोल शिंदे, राणी क्षीरसागर, कल्पना मानकुमरे यांच्यासह अनेक सेवेकरी, भाविक, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग मनोभावे आपली सेवा बजावत आहेत. सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक 7 रोजी सांयकाळी ४ वाजता श्री स्वामींची पालखी सोहळा होणार असून गुरूवारी दिनांक 8 रोजी दु.१ ते ५ या वेळेत महाप्रसादाचे आयेजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
” श्री स्वामी समर्थ गुरु चरित्र पारायण सेवेने बदलेल आपले संपूर्ण आयुष्य”
विविध स्वामी सेवा केंद्रांवर श्री दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र वाचनाची दिव्य संधी उपलब्ध असून “श्री गुरूचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो. या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज-श्रीपाद श्रीवल्लभ महाराज-श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांपैकी काही लीलांचा समावेश केला आहे. अति दुःखी व पीडित तसेच विविध बाधांनी किंवा कोणत्याही समस्येने त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्याचे दुःख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते, त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रुपांतर होवून प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी चिरःकाल टिकते.सर्व स्वामी भाविकांना विनंती कि त्यांनी आपल्या जवळ असलेल्या स्वामी सेवा केंद्रात, श्री दत्त जयंती सप्ताह काळात गुरुचरित्रग्रंथाचे सामुदायिक पारायणात सहभागी व्हावे. स्वामी सेवेची संधी सोडू नये.
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे.