कुडाळ दिनांक. 5 – सैारभबाबा शिंदे युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा -2022 चा बक्षीस वितरण सोहळा श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व विजेत्यांना आकर्षक गृहउपयोगी वस्तू व गिफ्ट बक्षिस म्हणून देण्यात आले व त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात साजरा करण्यात आला, कुटुंबातील सर्वांच्याच लाडक्या बाप्पाच्या उत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सैारभबाबा शिंदे युवा मंच यांच्या वतीने गौरी गणपतीनिमित्त सजावट स्पर्धा 2022 घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कुडाळ गावातील महिलांनी उस्फुर्त सहभाग घेऊन तब्बल 64 महिलांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती, नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून रविवार दिनांक 2 आँक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदीरात या स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला व बक्षिस वितरणही करण्यात आले,
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापगड कारखान्याच्या संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्या सैा. शोभाताई बारटक्के, डाँ. सई जंगम, डाँ. रत्नप्रभा माने, ग्रामपंचायत सदस्या मणिषा नवले, तनिष्का सदस्या सुलभाताई लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशिल शिंदे, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे संचालक अमोल शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते,
गौरी गणपती सजावट स्पर्धेत 64 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मोनिका किशोर दिक्षित यांनी प्रथम क्रमांक तर विद्या विलास खटावकर यांनी द्वितीय क्रमांक व ज्योती राजेंद्र वाघ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे माय्रको आोव्हन, कुलर, मिक्सर तसेच इतर पाच विजेत्यांना इस्त्री, अशी बक्षिसे देण्यात आली तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व 64 स्पर्धकांना प्रोत्साहनपर हमखास गिफ्ट म्हणून स्टीलचा टिफिन बाँक्स वितरीत करण्यात आले.
यावेळी डाँ. सई जंगम, डाँ. रत्नप्रभा माने यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पत्रकार महेश बारटक्के, परिक्षक दत्तात्रय तरडे, बन्सिधर राक्षे, दिनकर पवार, निलेश पवार, सचिन मदने, विक्रम खटावकर, स्वानंद शिवदे आदींनी सहकार्य केले. सर्व विजेत्यांचे प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, सैा. अंकिता सैारभ शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कुडाळ व पंच्रकोशीतील महिलांसाठी यापुढेही सामाजिक उपक्रम राबवून महिला सक्षमिकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले.