जावळीजिह्वासामाजिक

बोंडारवाडी धरणाला विजय सागर नाव देऊ – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

‌कुडाळ ता.30 – विजयराव मोकाशी यांच्या जाण्याने संघटनेची मोठी हानी झाली असून, प्रशासनाच्या लालफितीत अडकलेल्या बोंडारवाडी धरणासाठी विजयराव मोकाशी यांनी सातत्याने पाठपुरावा करत धरणाला मंजूरी मिळविली असून मी जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरणाचा पाठपुरावा केला असला तरी तो शब्द मोकाशी साहेबांचाच होता . ते कायम आपल्यातच राहतील यासाठी विजय सागर नावानेच धरण निर्मिती होईल . हा टप्पा ही पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडू . यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करू या असे मत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .

केळघर ( ता . जावली ) येथे बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक कै . विजयराव मोकाशी यांच्या आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते .यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ,डॉ.भारत पाटणकर,,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे ,माजी सभापती बापूराव पार्टे , भाऊसाहेब उभे , चैतन्य दळवी ,प्रा . तुकाराम ओंबळे , त्यांचे बन्धू राजेंद्र मोकाशी , मुलगा कुणाल मोकाशी , समरजीत मोकाशी , मोहनराव कासुर्डे ,जावली बैंकेचे संचालक अरुण सुर्वे , विलासबाबा जवळ , शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , उद्योजक राजेंद्र धनावडे , रामभाऊ शेलार , आनंदराव सपकाळ , वसंत शिंदे , शांताराम कदम , सूर्यकांत देशमुख आदिंची प्रमुख उपस्थित होती .
यावेळी डॉ भारत पाटणकर बोलताना म्हणाले , विजयराव मोकाशी यांची उणीव जोपर्यंत बोंडारवाडी धरण होत नाही . तोपर्यंत भरून निघणार नाही . त्यांच्या जाण्याने सर्वांनच्याच डोळ्यात पाणी येत असून याच्या ठिणग्या होण्याची वाट पाहू नये परंतु आता आ . शिवेद्रसिहराजे आपल्या सोबत आहेत त्यामुळे त्याची आता गरज भासणार नाही . एक टीएमसी धरणाला मंजूरी मिळाली असून आता केवळ सर्व्हेचे काम बाकी आहे . अशी ग्वाही श्रमिक मुक्ति दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर यांनी दिली .
यावेळी माजी सभापती बापूराव पार्टे , शिवसेनेचे सपर्क प्रमुख एकनाथ ओबळे , विलासबाबा जवळ , आदिनाथ ओंबळे ,सुर्यकांत देशमुख ,शशिकांत गुरव , नारायण धनावडे , दत्ता बेलोशे , विजय सपकाळ , बजरंग चौधरी , उषा उंबरकर , जे डी जुनघरे , जे . टी . पवार , बाजीराव चिकणे , चद्रकांत धनावडे , दत्ताञय भणगे , सुधा चिकणे आदिची भाषणे झाली .
कार्यक्रमासाठी आदिनाथ ओंबळे , जगन्नाथ जाधव ,वैभव ओंबळे , नारायण सुर्वे , आतिश कदम , आनंदराव जुनघरे , वरोशीचे सरपंच विलास शिर्के , उपसरपंच संदीप कासुर्डे , माजी सरपंच सुरेश कासुर्डे , श्रीरंग बैलकर , आदि परिश्रम घेतले .
यावेळी ५४ गावातील सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील , विविध संस्थाचे पदाधिकारी , मुंबई – पुणे स्थित जावलीकर, श्रमिक मुक्त दल व बोंडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य ,ग्रामस्थ , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूञसंचालन एकनाथ सपकाळ,यांनी केले . तर आभार राजेंद्र मोकाशी यांना मानले .

sahyadri-today-logo
sahyadri-today-logo

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button