कुडाळ ता.28 – दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात साजरा करण्यात आला, कुटुंबातील सर्वांच्याच लाडक्या बाप्पाच्या उत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सैारभबाबा शिंदे युवा मंच यांच्या वतीने गौरी गणपतीनिमित्त सजावट स्पर्धा 2022 घेण्यात आल्या होत्या.
प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या पुढाकारातून तसेच पत्रकार महेश बारटक्के,बन्सिधर राक्षे गुरूजी , दत्तात्रय तरडे सर, अमोल शिंदे, दिनकर पवार,निलेश पवार, सचिन मदने यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्विपणे राबविण्यात आला. व परिक्षण करण्यात आले होते, या स्पर्धेतील विजेत्यांना माय्रको आोव्हन, कुलर, मिक्सर तसेच इस्त्री, अशी मोठी बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच स्पर्धेत सहभाग झालेल्या सर्व स्पर्धकांना हमखास बक्षिस म्हणून प्रत्येकाला गिफ्ट देण्यात येणार आहे. या बक्षिस वितरण सोहळ्यास महिलांनी व सर्व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी उत्सव काळात गौरी महालक्ष्मी व गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.