जिह्वा

सरताळे गावामध्ये लंपी चे लसीकरण शंभर टक्के पूर्ण

पशुवैद्यकीय दवाखाना कुडाळ व पशुवैद्यकीय महाविद्यालय क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय शिरवळ यांचा उपक्रम

कुडाळ प्रतिनिधी

पशुवैद्यकीय दवाखाना कुडाळ व पशुवैद्यकीय महाविद्यालय क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय शिरवळ येथील इंटरशिप करणाऱ्या स्टुडन्ट च्या माध्यमातून सरताळे गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण
सध्या लंपी आजारामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक जनावरे मृत्युमुखी पडू लागल्याने शासनाच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

कुडाळ पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत डॉक्टर विवेक इंटनकर यांनी लसीकरण मोहीम सुरू केली असून 6 ते 7 गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अजूनही कुडाळ विभागातली 12 ते 13गावे लसीकरणापासून वंचित आहेत कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे लसीकरण पूर्ण होण्यास विलंब होत असून मोजक्या कर्मचाऱ्यांना घेऊन वैद्यकीय अधिकारी विवेक इंटनकर प्रत्येक गावागावात जाऊन वाडीवस्तीत लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अजूनही बऱ्याचश्या गावांमध्ये लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे याची कल्पना येताच सरताळे गावची कन्या डॉ. प्राणेश्वरी दिलीप भिसे हिने आपल्या गावातील जनावरांना लंपीची लागण होऊ नये आपल्या गावातले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे गावातील एकही पशु या लंपी आजाराने मृत्युमुखी पडू नये म्हणून शिकत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालतील सरांची परवानगी घेऊन पशुवैद्यकीय इंटरशिप करत असल्याने तिने इंटरशिप करणाऱ्या डॉ मुग्धा देसाई, डॉ प्रियांका सपकाळ, डॉ सिद्धी वेल्हाळ ,डॉ अंकिता भोसले ,मैत्रिणींना घेऊन डॉ विवेक इंदलकर यांच्याशी संपर्क साधून सरताळे गावातील सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 पर्यंत प्रत्येक वाडीवस्तीत जाऊन 182 जनावरांचे लसीकरण पूर्ण केले . सरताळे गावातील कन्या पशुवैद्यकीय एंटरशिप करत असल्याने पुढे येऊन गावातील लसीकरण पूर्ण केल्याने डॉ इंदलकर गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी तिचे आभार मानून तिचा गावात पत्रकार संघ जावली चे अध्यक्ष वसीम शेख यांच्या हस्ते सन्मान केला . यावेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रूपालीताई भिसे ग्रामपंचायत सरपंच सोनाली पवार, ग्रामपंचायत सदस्य निशांत नवले , भीमराव भिसे ,दत्ता नवले ,प्रमोद भिसे, आप्पा नवले ,रुपेश जाधव, या सर्व सह सरताळे गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचा सविस्तर बातमी फक्त……सह्याद्री टुडे न्यूज चॅनेल वर
सामान्य जनतेचा आवाज
बातम्या निवडक….बातम्या निर्भीड……सह्याद्री टुडे

sahyadri-today-logo
sahyadri-today-logo

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button