जावळीराजकीय

जावली तालुक्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही : नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले; सोमर्डीत विविध विकासकामांचा शुभारंभ – वसंतराव मानकुमरेंचा वाढदिवस उत्साहात संपन्न तर संदिप परामणे यांच्या कामाचे कैातुक


कुडाळ: जावली तालुक्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही,सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन. सर्वांनी एक संघपणे राहून निवडणूकीला सामोरे जाऊया. संदीप परामने यांनी आपल्या घराण्याचा वारसा जपला आहे.आज वाचनालयाची नूतन इमारत उभी राहणार असून यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.याकरिता निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.


सोमर्डी ता.जावली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचा भूमिपूजन व सोमर्डी-शेते सोसायटी इमारत उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्व बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे ,प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे, ,जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,उद्योजक दत्ताशेठ भालेघरे, जावली बँकचे चेअरमन विक्रम भिलारे,व्हॉईस चेअरमन चंद्रकांत दळवी, दत्ता गावडे, चंद्रकांत गावडे, हिंदुराव तरडे, रवींद्र परामणे, मालोजीराव शिंदे, जिल्हा बँक मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे, मच्छिंद्र मुळीक,सागर धनावडे, जयदीप शिंदे,विकास धोंडे,संतोष शेलार,जयश्री मानकुमरे, मोनाली बारटक्के,रमेश परामने आदी मान्यवर उपस्थित होते.


वसंतराव मानकुमरे म्हणाले,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास होत आहे. गावोगावचे मूलभूत प्रश्न, रस्ते,पर्यटन हे सर्व प्रश्न ते सोडवत आहेत.आपल्या प्रतापगड कारखान्यालाही त्यांनी हातभार लावल्याने कारखाना व्यवस्थितरीत्या चालला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नगरपंचायत तसेच जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या सर्व जागा निवडून आणू.असे सांगून शेर को डरा सकते है धमका नही असे म्हणत आपल्या शैलीत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.यावेळी वसंतराव मानकुमरे यांचा मान्यवरांच्या व त्यांच्या सर्व कुटूंबियांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास तालुक्यातील भाजप नेते, पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रवींद्र परामने यांनी प्रास्ताविक केले.संदीप परामने यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button