जावळी

करहरला भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली ; शूर सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत घोषणाबाजी

कुडाळ ता. 15- ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अस्मितेचे महत्त्वाचे उदाहरण असून या मोहिमेचे यश लोकांमध्ये पसरवण्यासाठी व ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या अदम्य धैर्य आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी
तसेच सैनिकांचे मनोधैर्य आत्मविश्वास वाढवण्यासाठी करहर ते आंबेघर अशी तिरंगा रॅली काढण्यात आली, जावली तालुका भाजपाच्या वतीने शूर सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली आयोजित केली होती यानिमित्ताने करहर बाजारपेठेत देशप्रेमाची लहर निर्माण होऊन रॅलीतील घोषणांनी  देशभक्तीची भावना भरून गेली.


करहर ता.जावली येथील बाजारपेठेत भाजप जावली मंडल पुर्वच्या वतीने करहर ते आंबेघर अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तान विरुद्ध केलेल्या एअर स्ट्राईक कारवाई केल्या बद्दल त्यांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यात आले, सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.रॅलीमध्ये भाजपचे नेते व प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, पूर्वचे मंडल अध्यक्ष संदीप परामणे, माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, प्रमोद शिंदे, समाधान पोफळे, संतोष महामुलकर, भाईजी गावडे, विकास धोंडे, राजू गोळे, भाऊसाहेब जंगम, जीवन भोसले, तात्या पवार, प्रदीप बेलोशे, किरण भिलारे, शिवाजी गोळे, राजू महाडिक, रवि गावडे, संदिप निकम,समिर आतार आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी सैारभ शिंदे, श्रीहरी गोळे व संदिप परामणे आदींनी आपले मनोगते व्यकत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button