जावळी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भीमसैनिकांनी आपले अस्तित्व दाखवावे – अशोक गायकवाड : जावलीत अभूतपूर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीत जय भीम फेस्टिवल संपन्न

कुडाळ ता. 11 – जावली तालुक्यातील रिपाई व भारतीय बौद्ध महासभेची संघटना एकत्रितपणे आंबेडकरी चळवळ चालवत असल्यामुळे जावली तालुक्यात रिपाईचे खूप चांगले मजबूत संघटन झाले असून भीमसैनिकांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवले पाहिजेत असे प्रतिपादन रिपाईचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी बोलताना केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जावली तालुका व भारतीय बौद्ध महासभा यांचे संयुक्त विद्यमाने मेढा ता.जावळी येथे 7 वा जयभीम फेस्टिवल व बौद्ध धम्म परिषद चेआयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, वसंतराव चव्हाण, सातारा पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, पूजा बनसोडे, डॉ संपत कांबळे, रिपाईचे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालुकाध्यक्ष संतोष खरात, दशरथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. जयभीम फेस्टिवलच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भीम सैनिकांच्या उपस्थितीत बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. मिरवणुकीत नागपूर येथील पूज्य भन्ते महामोगलायन व त्यांचा भन्ते संघ, भीमसैनिक, घोडे, बँड व बुद्ध भीम रथाच्या सजावटीने शोभा आणली, यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले, तसेच शेकडो भीमसैनिकांनी रक्तदानही केले,

सुप्रसिद्ध गायक वैभव -अनिकेत यांच्या भीमगीतांनी वातावरण जल्लोषमय केले त्यानंतर एल्गार सभा झाली. रिपाई तालूकाध्यक्ष एकनाथ रोकडे बोलताना म्हणाले, जावली तालुक्यात आंबेडकरी चळवळीचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी चळवळीतील तरुणांच्या डोक्यात व रक्ताच्या थेंबा थेंबात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची हिंमत जागृत करण्यासाठी तसेच शोषित, पीडित, वंचित समाजातील लोकांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांना हिंमत व बळ देण्यासाठी जय भीम फेस्टिवल व बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन जावली तालुक्यात केले आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव दशरथ कांबळे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button