जावळी

कुडाळचा “पिंपळबन प्रकल्प” भावी पिढ्यांसाठी वरदान – अमरसिंह पाटणकर – ‘सातारा भूषण’ पुरस्काराने सन्मानित: रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेकडून वितरण

कुडाळ ता. 11 – जावळी तालुक्यातील कुडाळ येथील पडीक असणाऱ्या जागेत लोकसहभागातून साकारलेल्या पिंपळबन उपक्रमाला रोटरी क्लब सातारा सेव्हन हिल्स या संस्थेच्या वतीने ‘सातारा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भावी पिढ्यांना वरदान ठरणाऱ्या या जीवनावश्यक निसर्ग संवर्धक उपक्रमाचा रोटरी क्लब ऑफ सातारा सेवन हिल्स या संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरव केला.

Closed Up a Bunch of Beautiful Bodhi Tree Leaves in the Sunlight

सातारा येथे या रोटरी क्लब सातारा सेव्हन हिल्स यांच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ रोटरी अमरसिंह पाटणकर, डॉ. राहुल फासे, राजीव रावळ, अध्यक्ष अमित बेंद्रे,सचिव हरीश भोसले व डॉक्टर विक्रांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विक्रांत देशमुख यांनी रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्सच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची व देण्यात येणाऱ्यापुरस्काराबाबत माहिती दिली.पिंपळबन उद्यानाच्या माध्यमातून कुडाळ गावची एक वेगळी ओळख निर्माणकरण्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्या पिंपळबनचे संवर्धक दिवंगत मनोज आप्पा वंजारी यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना मरणोत्तर सातारा भूषण पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा मनोज वंजारी यांना रोटरी सातारा भूषण अवॉर्ड 2025’ देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याच बरोबर पिंपळबनचे संस्थापक व संवर्धक महेश पवार व विद्यमान सर्व सक्रिय सदस्यांना ” सातारा भूषण ” अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री पिंपळेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भाऊराव शेवते, भिकू राक्षे, वीरेंद्र शिंदे, सोमनाथ कदम, सूर्यकांत जोशी, महेश बारटक्के, अविनाश गोंधळी, राहुल ननावरे, आदी उपस्थित होते . रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात साहित्यिक ,शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या व्यक्तींना इन्स्पिरेशन ऑफ रोटरी, सातारा भूषण, व्यावसायिक सेवा, जिगीषा व नेशन बिल्डर अशा विविध पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.कुडाळच्या पिंपळबन समितीच्या माध्यमातून निसर्गाचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचे व वाढवण्याचे होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रशंसोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरसिंह पाटणकर यांनी काढले. पिंपळबनचे सदस्य अविनाश गोंधळी यांनी यावेळी पिंपळबन या उपक्रमाची माहिती उपस्थिताना दिली. आजवर पिंपळबनच्या वाटचालीत सर्व ग्रामस्थ, हितचिंतक, निसर्गप्रेमी तसेच सर्व पिंपळबन टीम यांचे मौलिक सहकार्य लाभत आहे. आपल्या सांघिक प्रयत्नामुळेच ‘आपल पिंपळबन’ हा प्रकल्प आज दिशादर्शक ठरत आहे. यापुढील काळातही सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन महेश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा भिसे व स्मिता बेंद्रे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button