“क्रिकेटची जत्रा” या संकल्पनेतून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत – वसंतराव मानकुमरे ; कुडाळला सुपर प्रो लीग क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न – लंबोदर सुपर किंग्ज संघ ठरला विजेता

कुडाळ ता. 29 – जावळी सारख्या ग्रामीण भागात आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर केएसपीएल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या या स्पर्धेत एक लाखाहून अधिकची बक्षिसेही खेळाडूंना देण्यात आली त्यामूळे अशा स्पर्धेतून व मिळणाऱ्या बक्षिसांतून नवोदित खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे, सध्या ग्रमिण भागात यात्रांचा हंगाम सूरू असून कुडाळमध्ये क्रिकेटची जत्रा या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून भरविण्यात आलेल्या या स्पर्धेतूनदेशपातळीवरील खेळाडू निर्माण होवोत अशी सदिच्छा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

कुडाळ ता.जावळी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत व सैारभबाबा शिंदे युवा मंचच्या वतीने कुडाळ सुपर प्रो लीग दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लंबोदर सुपर किंग्ज या संघाने 44 हजार 444 रूपयांचे प्रथम तर प्रतापगड फायटर्स या संघाने 22 हजार 222 रूपयांचे द्वितीय क्रमांकाचे रोख बक्षिस व पारितोषिक पटकावले. बक्षिस व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मानकुमरे बोलत होते,

यावेळी प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, उद्योजक दत्ता भालेघरे, जितेंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, भाजपाचे नुतन तालुकाध्यक्ष संदिप परामणे, यांच्यासह ग्रामपंचायत व कुडाळ विकास सेवा सोसायटीचे सदस्य, यात्रा कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते, या स्पर्धेचा शुभारंभ सैारभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता, या स्पर्धेत खेळाडूंसाठी व संघासांठी विविध बक्षिसे व रोख रक्कम ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये बालाजी पँथर्स, कुडाळ जिमखाना, प्रतापगड फायटर्स, सहयाद्री टायगर्स, लंबोदर सुपर किंग्ज, पिंपळेश्वर वाँरिअर्स या सहा संघानी सहभाग घेतला होता. दोन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचे युट्युब प्रणाली द्वारे लाईव्ह प्रक्षेपणही दाखविण्यात आले होते, याप्रसंगी कुडाळ पंचक्रोशीमधील सर्व क्रिकेट प्रेमी व युवा वर्ग उपस्थित होता.
