
कुडाळ ता. 14 – स्वामी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून व शुभवी दूध संकलन केंद्राच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी स्वामी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट समूहाने हे केंद्र सुरू करून येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या या प्रयत्नाला नक्की यश येईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांनी बोलताना केले.

गोपाळपंथाची वाडी ता.जावली येथे स्वामी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून शुभवी दूध संकलन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या केंद्राचे उद्घाटन प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुहास गिरी,सातारा येथील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे मार्गदर्शक संचालक व माजी सभापती किरण साबळे पाटील, किरण भाऊ साबळे पाटील, संचालिका वैशालीताई किरण साबळे पाटील, सौ शितलताई किरण साबळे, महेश शिवणकर, श्री सचिन मिठारे श्री योगेश देशमुख श्री सागर खटावकर श्री दिलीप जाधव श्री प्रशांत साबळे, सयाजी कदम यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना किरण साबळे पाटील, म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून जास्जातीत जास्त दूध संकलन करण्याचा आमचा मानस आहे, या भागामधील दूध उत्पादक व शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा आमचा प्रयत्न असून, या दुध केंद्रात फॅट डिग्रीची मशीन तसेच आवश्यक साधन सामग्री यामधे पूर्णपणे पारदर्शकपना जोपासण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळेल यासाठी आम्ही कार्यतत्पर राहू , या, महेश शिवणकर, यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले, यावेऴी खर्शी, गोपाळपंथाची वाडी, पानस, कळंबे, बेलावडे, आरडे, मोरघर, महिगाव, सायगाव या गावातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

