
कुडाळ ता. 26 जावली तालूका भूमी अभिलेख शाखेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा- रिपाई जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे व रिपाई महिला अध्यक्ष पूजा बनसोडे यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सातारा यांना निवेदनाद्वारे केली मागणी.जावली तालुक्यात भूमी अभिलेख शाखेचे काम खूप कासवाच्या गतीने चालले असून जावली तालुक्यातील अनेक तातडीची, अति तातडीची मोजणीचे पैसे भरूनही सामान्य लोकांना मोजणीसाठी सहा सहा महिने एक-दोन वर्ष थांबावे लागत असून त्यामुळे लोकांचे पैसा व वेळ विनाकारण मोजणी ऑफिसला वारंवार चक्कर घालण्यासाठी वाया जात आहे तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सामान्य लोकांना कर्मचारी कमी असलेचे कारण सांगून कुठलीही व्यवस्थित माहिती देत नाहीत सहकार्य करीत नाहीत त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक व मानसिक खूप कुचंबना होतं आहे.

जावली तालूक्यातील गावे डोंगर कपारी, दुर्गम भागात असल्याने अनेक गावांना एसटी किव्हा कुठलेही वाहन वेळेवर जात येत नाही तरी सुद्धा मोजणी वेळेवर व्हावी या अपेक्षेने मेढा या ठिकाणी अनेकांना वारंवार मोजणी ऑफिस ला चक्कर मारायला लागते परंतु भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळत असतात अति तातडीच्या मोजणीला दुप्पट पैसे भरूनही सहा सहा महिने वर्षभर वेळ लागत असेल तर लोकांना जास्त घेतलेले पैसे भूमी अभिलेख ने विनाअट मागारी द्यायला पाहिजेत काही प्रकरणात मोजणी उद्या येणार आहे असा प्रोग्राम दाखवत असूनही कुठलीही नोटीस अथवा मोबाईल मेसेज किंवा माहिती मोजणीदारास अथवा लगतदारास दिली जात नाही एवडेच काय अनेक प्रकरणात दुसऱ्या दिवशी डिक्लेर असलेल्या ऑनलाईन मोजणी प्रोग्राम ची माहिती स्वतः मोजणी ऑफिस जावली लाच माहिती नसते इतका हलगर्जीपणा अधिकारी व कर्मचारी करीत असून त्यामुळे अनेकवेळा मोजणी प्रोग्राम खोटी कारणे देऊन परस्पर रद्द केले जात आहेत.
याप्रसंगी रिपाई जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे व रिपाई महिला जिल्हा अध्यक्ष पुजाताई बनसोडे यांनी सातारा जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अधिकारी यांना सांगितले की तातडीची अतितातडीची मोजणीची तसेच मुदत संपलेली जी प्रकरणे आहेत ती ताबडतोब 10 एप्रिल च्या आत निकालात काढावी व जावळीच्या जनतेला समजण्यासाठी गेलेवर्षभराची भूमी अभिलेख ने केलेल्या कामाची माहिती ऑनलाईन अपलोड करावी अन्यथा 15 एप्रिल ला भूमी अभिलेख सातारा व भूमी अभिलेख शाखा जावली च्या ऑफिस मध्ये मेंढरे सोडून ऑफिस समोर रिपाईच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात, बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
