कुडाळ ता. 26 पन्नास हजारांपेक्षा जास्त सभासद असलेल्या सदर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचा ऊस कारखान्याने तोडू नेला परंतू जवळपास १६ डिसेंबर २०२४ पासून ऊस बीले थकीत आहेत. मुळात शासन निर्णयाप्रमाणे साखर कारखाने ऊस तोडणी करून गेल्यापासून १५ दिवसांचे आत एफ .आर.पी. ची रक्कम देणे बंधनकारक असतानाही ती दिली जात नाही . अशी माहिती प्रशांत तरडे यांनी . प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे

.
श्री.प्रशांत तरडे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मध्यंतरीच्या काळात खुप मोठी मोठी आश्वासने देत भुईंज खंडाळा कारखान्याच्या निवडणूका जिंकल्या परंतू निकणूक काळात दिलेली सर्व आश्वासने पोकळ व खोटी तसेच दिशाभूल करणारीच ठरली असे म्हणावे लागेल. कारण एक भाऊ महाराष्ट्र राज्याचे मंत्री व साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच सातारा जिल्हा बँकेचे संचालकही तर दुसरा भाऊ राज्यसभा खासदार , व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असतानाही ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना वाऱ्यावर सोडलेले दिसत आहे. मा .एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सदर कारखान्यास ५०० कोटीपेक्षा जास्त रक्कम थकहमी मिळवून देवूनही तीच परिस्थीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सोसायटी व बँकाची कर्जे कशी फेडायची हाच यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या वर्षीची तरी वर्षा अखेर पर्यंतची एफ .आर .पी . मिळणार का? आणि गुढी पाडवा गोड होणार का? जर गुढी पाडव्या पूर्वी एफआरपी ची सर्व रक्कम मिळाली नाही तर साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रशांत तरडे यांनी दिला आहे.


