
कुडाळ ता 21 – : महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे सकाळ चॅरिटेबल फाउंडेशन व निस्वार्थ फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत चार शाळांमधील एकूण ५० विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निस्वार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश बाहेती, वैभव कुलकर्णी, सकाळ सोशल फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल गरड, विजय पिसाळ, पतित पावन विद्यामंदिर, ओझर्डेचे मुख्याध्यापक गिरीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेश बाहेती म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे अंतर कापावे लागते अशा विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्याने त्यांची शैक्षणिक वाटचाल सुलभ होणार आहे. तसेच सायकल चालविल्याने एक प्रकारचा शारिरिक व्यायामही होतो, त्यामुळे वि्द्याथ्य़ांच्या अधिक तंदुरूस्तीसाठी व आरोग्यासाठीही फायदा होणार आहे,

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणात प्रगती करण्याचाही सल्ला दिला. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. निस्वार्थ फाउंडेशन व सकाळ समूहाच्या या सामाजिक कार्याचे लाभार्थी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी व शाळेच्या वतीने कौतुक करून आभार मानन्यात आले. यावेळी विविध शाळांतील शिक्षक व पालक उपस्थित होते.
