
सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या संघटकपदी इम्तियाज मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र तर्फे सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा पार पडली. यावेळी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेनंतर मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला कार्यक्रमात संघटनेच्या राज्य संघटक पदी लोकशाही न्यूज मराठीचे पत्रकार इम्तियाज मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचाही विशेष सत्कार या समयी करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्याध्यक्ष माने म्हणाले इम्तियाज मुजावर हे संघटनेला बलशाली बनवून जिल्ह्यात पत्रकारांची एक चांगले संघटन निर्माण करतील, याची खात्री आहे. म्हणूनच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यावेळी बोलताना मुजावर म्हणाले, संघटनेने दिलेली जबाबदारी मी यथाशक्ती पार पाडेन आणि जिल्ह्यात तसेच राज्यात मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन.यावेळी सतीश सावंत, तेजस राऊत, महेश खुगांवकर तसेच जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
