
कुडाळ ता.20 : आपल्या कुशाग्र बुद्धीने व मेहनतीने काम करून यश मिळवल्यानंतर पुरस्काराच्या स्वरूपात शाब्बासकीची थाप पाठीवर मिळाल्यास पुढील यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. स्वराज्य गुनीजन गौरव
विकास परिषद सातारा यांच्या माध्यमातून दिले गेलेले पुरस्कार अतिशय प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्य गुनीजन गौरव विकास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी, राज्यस्तरीय व्यक्ती विशेष, राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी, व देश सेवेसाठी आपली सेवा बजावताना वीर मरण आलेले जवानांना मरणोत्तर पुरस्कार असे विविध पुरस्कार कुडाळ ता. जावली येथे एका खास कार्यक्रमात नुकतेच प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक धनंजय चोपडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष रमेशबापू उबाळे, जिल्हा क्रीडा कार्यालय समन्वयक शिवाजी निकम, छत्रपती राजश्री शाहू कला क्रीडा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव,द युवा ग्रामीण पत्रकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ कदम, सदस्य वीरेंद्र शिंदे, संजय शिंदे, सुनिल रासकर ग्रामपंचायतीचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,

यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर ,मुंबई, अहिल्यानगर, पुणे, लातूर, रायगड, नागपूर, बुलढाणा या ठिकाणावरून पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते,यामध्ये राम उदिकर नाशिक, श्रीकर रेळेकर सर सातारा, निलेश भोसलेसर नवी मुंबई, संकेत थोरात अहिल्यानगर ,राजेश ढेकळे सर जेजुरी, विष्णुपंत पाटील सर पुणे ,सौ पूजा वाघ मॅडम सातारा ,डॉ महादेव शिंदे सर रायगड, श्री रविकांत वेदपाठक गुरुजी सातारा ,योगेश यादव सर सातारा, दिलीप चव्हाण सर वाई सातारा ,नरेश लोहारा सर पाचगणी, सातारा गणेश गिरी सर लातूर, किरण यादव सर नागपूर, आंचल राऊत मॅडम नागपूर, इमरान शेख सर बुलढाणा, काजल राऊत मॅडम नागपूर, विनो दधारे सर नागपूर, ज्योत्सना वायदंडे मॅडम सातारा, अशोक शेवते कुडाळ प्रगतशील शेतकरी, सुनील जाधव सर व्यक्ती विशेष पुरस्कार, शहीद जवान अंबादास पवार स्वराज्य मरणोत्तर पुरस्कार ,श्री नितीन मोहिते सर जावली, प्रशांत मोरे सर कवठे, सातारा गिरीश मखमले सर बुलढाणा, संगीता बैले मॅडम कराड, रेखा कसबे मॅडम कराड, बाळकृष्ण भंडारे सातारा ,सतीश बुद्ध साहेब आदर्श प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती सातारा, सीमा डेरे मॅडम कवठे वाई, सीमा पार्टी मॅडम जावली, प्रमिला राठोड मॅडम , वाई सचिन काळे सर एक्स आर्मी रिटायर कुस्ती कोच वडूज, या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले .यावेळी संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेजनही केले होते, उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेचे हे तिसरे वर्ष असून संस्थेच्या कार्याबद्द्ल समाधान व्यक्त करून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. यावेळी 150 विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांत यश मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला, तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व मान्यवरांना मानपत्र, सन्मानचिन्ह, ऑफिशियल बॅच देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोंधळ, उपाध्यक्ष अजित वाडकर, सचिव नितीन सूर्यवंशी, सदस्य विलास मिसाळ, आप्पा मोहिते,कविता गोंधळी, आदी सदस्यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेत्री सौ आदाटे मॅडमयांनी केले तर, प्रास्ताविक जिल्हा सचिव नितीन सूर्यवंशी यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष अविनाश गोंधळी यांनी मानले.
