
कुडाळ, १७ फेब्रुवारी: जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी सरताळे गावचे सुपुत्र लक्ष्मण आनंदराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान युवा चेअरमन सौरभबाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. कारखान्याचे मार्गदर्शक संस्थापक संचालक माजी चेअरपर्सन सुनेत्रा शिंदे, उपाध्यक्ष अँड. शिवाजीराव मर्ढेकर, यांच्संयासह कारखान्याचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.

प्रतापगड सहकारी साखर कारखाना जावळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे सहकार मंदिर आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना कार्यरत आहे, लक्ष्मण पवार यांच्या निवडीने एक चांगला अभ्यासू सहकारी संचालक मंडळाला मिळाला आहे असा विश्वास सैारऊ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला .
यावेळी, नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सलग दोन हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. प्रतापगड अजिंक्य उद्योग समूहाच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व ऊस गाळप करण्यात आले असून, विक्रमी ऊस गाळप करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला आहे. चार वर्षे बंद असलेल्या या कारखान्याला दोन वर्षांपासून स्थिर आणि यशस्वीपणे सुरू ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर वेगाने पेमेंट देखील जमा होऊ लागले आहे. त्यामूळे शेतकन्यांमध्ये समाधान आहे. कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबददल श्री पवार यांचे सर्वांनी अभिनंदन केले तर श्री पवार यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.

